शायोमीचे नवे स्मार्ट टीव्ही सादर : Mi TV 4 Pro, 4A Pro, 4C Pro

शायोमीने आज Mi TV 4 Pro (55inch), Mi TV 4A Pro (49inch) आणि Mi TV 4C Pro (32inch) असे तीन टीव्ही सादर केले आहेत. हे सर्व टीव्ही अपग्रेडेड पॅचवॉल OS सोबत येणार असून यामुळे व्हॉईस सर्च, जास्त कंटेंट पाहता येईल तसेच  अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर या टीव्ही असतील. आधी उपलब्ध असणाऱ्या कंटेंट पार्टनर सोबतच यामध्ये जिओ सिनेमा, Eros Now, Hook आणि epic on चा समावेश आहे त्याचबरोबर प्राईम व्हिडिओ लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉईस सर्च टीव्ही वर उपलब्ध होणार असून नवीन रिमोट मध्ये खास बटन देण्यात आले आहे. या टीव्हीमध्ये अँड्रॉइड ओरिओ (8.1) चा समावेश असेल. सोबतच भविष्यात अँड्रॉइड पाय अपडेट सुद्धा देण्यात येणार आहे. अँड्रॉइड टीव्ही सोबत यूट्यूब, Built in Chromecast त्याचबरोबर प्लेस्टोअर सुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या टीव्हीना सुद्धा पॅच वॉल अपडेट मिळणार आहे. जवळपास ५ लाख स्मार्ट टीव्हीची विक्री शायोमीने केली असून ६५० टीव्ही सर्व्हिस पॉईंट उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Mi TV 4 Pro (55 inch) फीचर्स –

डिस्प्ले : 4K HDR (3840×2160 pixels) display
178-degree viewing angle, 60Hz refresh rate
प्रोसेसर Amlogic Cortex A53 quad-core, Mali-450 MP3 GPU
रॅम : 2GB of RAM, 8GB of storage.
इतर : Wi-Fi, three HDMI (one ARC) ports, two USB 2.0 ports, one Ethernet port, one AV component port, one S/PDIF audio port
Dolby Audio DTS two 10W speakers.
Bluetooth Mi Remote with voice control features.

लिंक – https://www.mi.com/in/mi-led-smart-tv-4-55-pro/ 
१० ऑक्टोंबर पासून mi.com व फ्लिपकार्टवर उपलब्ध
किंमत – ₹49,999

Mi TV 4A Pro (49 inch) फीचर्स –

डिस्प्ले : FHD HDR (1920×1080 pixels) display
178-degree viewing angle, 60Hz refresh rate
प्रोसेसर Amlogic Cortex A53 quad-core, Mali-450 MP3 GPU
रॅम : 2GB of RAM, 8GB of storage.
इतर : Wi-Fi, three HDMI (one ARC) ports, two USB 2.0 ports, one Ethernet port, one AV component port, one S/PDIF audio port, 3.5mm headphone jack
DTS  two 10W speakers.
Bluetooth Mi Remote with voice control features.

लिंक – mi.com/in/mi-led-smart-tv-4a-49-pro

९ ऑक्टोंबर पासून mi.com व अॅमॅझॉनवर उपलब्ध
किंमत – ₹29,999

Mi TV 4C Pro (32 inch) फीचर्स –

डिस्प्ले : HD (1366×768 pixels) display
178-degree viewing angle, 60Hz refresh rate
प्रोसेसर Amlogic Cortex A53 quad-core up to 1.5GHz, Mali-450 MP3 GPU
रॅम : 1GB of RAM, 8GB of storage.
इतर : Wi-Fi, three HDMI (one ARC) ports, two USB 2.0 ports, one Ethernet port, one AV component port, one S/PDIF audio port, 3.5mm headphone jack
DTS-HD, two 10W speakers.
Bluetooth Mi Remote with voice control features.

mi.com/in/mi-led-smart-tv-4c-32-pro

९ ऑक्टोंबर पासून mi.com व अॅमॅझॉनवर उपलब्ध
किंमत – ₹14,999

Exit mobile version