शायोमीने आज बेंगलुरूमध्ये नवीन इकोसिस्टम प्रॉडक्ट्स सादर केले आहेत. यामध्ये Mi Band 3, Air Purifier 2S, Mi Luggage, Mi Home Security Camera 360 यांचा समावेश आहे. यातील काही प्रॉडक्ट्स उद्यापासून तर उर्वरित १० ऑक्टोंबर पासून अॅमॅझॉन, फ्लिपकार्ट व mi.com याठिकाणी उपलब्ध होतील. त्याचबरोबर सर्व प्रॉडक्ट्स मी होम सोबतच ऑफलाईन पार्टनर कडे येणाऱ्या दिवसांत उपलब्ध होतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
शायोमीने आज सादर केलेले प्रॉडक्ट्स पुढीलप्रमणे :-
Mi Band 3
अनेक ग्राहक आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या मी बँड ३ ची घोषणा शायोमीने आज केली असून उद्यापासून अॅमॅझॉन तसेच mi.com वर विक्रीस उपलब्ध होणार आहे. यामध्ये मी बँड 2 पेक्षा मोठी, ०.७८ इंच OLED टच स्क्रीन, Curved 2.5D डिझाइन, टच बटणचा समावेश आहे. शिवाय व्हॉटसअॅप नोटीफिकेशन व टेक्स्ट मेसेज वाचता येणार सोबतच ३ दिवसापर्यंत हवामानाचा अंदाज समजणार आहे.
व्हिडिओ : https://youtu.be/ZIp57X8pgy4
मी बँड ३ हे ५० मीटर पर्यंत वॉटर रेझिस्टंट आहे त्याचबरोबर यामध्ये 110mAH बॅटरी चा समावेश असून इतर ब्रँड पेक्षा तीन पट जास्त दिवस चालेल असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे. मी फिट अॅपच्या मध्मातून हेल्थ ट्रॅकिंगची सुविधा सुद्धा यामध्ये आहे. Mi Band 3 Price -₹ 1999
Mi Air Purifier 2S
दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या Mi Air Purifier 2 चे अपडेटेड व्हर्जन आज सादर करण्यात आले असून उद्यापासून अमेझॉन, फ्लिपकार्ट व mi.com वर उपलब्ध असेल. यामध्ये डिजिटल OLED डिस्प्ले, अधिक चांगले एअर प्युरिफिकेशन टेक, स्मार्ट होम इंटिग्रेशन यांचा समावेश आहे. सोबतच गूगल असिस्टंट व अमेझॉनच्या अलेक्सा असिस्टंटचे इंटिग्रेशन उपलब्ध आहे.
व्हिडिओ : https://youtu.be/2lnJg_6188g
Mi Air Purifier 2S Price – ₹8,999
लिंक – Flipkart / Mi.com
Mi Luggage
मी लगेजची सुद्धा घोषणा शायोमीतर्फे करण्यात आली आहे. पॉलीकार्बोनेट बॉडी सोबतच स्क्रॅच रेझिस्टंट, TSA Approved Lock, Shock Absorbent, Dual Spinner Wheels, TPE Material, 4 Stop Adjustable Handle या सुविधा यामध्ये आहेत. 20 व 24 इंच अश्या दोन आकारात मी लगेज उपलब्ध असून. ब्लू, ग्रे आणि रेड रंगात येईल.
Mi Luggage Price – ₹2,999 (20 inch) / ₹4,299 (24 inch)
10 October पासून उपलब्ध
Mi Home Security Camera 360
मी सिक्युरिटी कॅमेरा मध्ये 360 डिग्री मध्ये AI मोशन डिटेक्शन, इन्फ्रारेड नाईट व्हिजन, 1080p FHD व्हिडिओ रेकॉर्डिंग व 2X झूम, 64GB स्टोरेज, 2-way Audio अशा सुविधा आहेत. Price – ₹2,699
10 October पासून उपलब्ध
शायोमी अंतर्गत २००+ इकोसिस्टम कंपन्या आहेत. या २००+ कंपन्यांकडून प्रॉडक्ट्स तयार केले जातात व शायोमी त्यांची गुणवत्ता व इतर गोष्टी तपासून शायोमी ब्रँड अंतर्गत सादर करते. शायोमीची सुरूवात सॉफ्टवेअर कंपनी म्हणून झाली होती व आज स्मार्टफोन बरोबरच शायोमीचे इतर प्रॉडक्ट्स सुद्धा उपलब्ध आहेत.