सारेगामा कारवा प्रीमियम म्युझिक प्लेयर सादर!

सारेगामा या संगीत क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचं कारवा हा म्युझिक प्लेयर सध्या चर्चेत आहे. याचं कारवा प्रीमियम हे नवं मॉडेल आता सादर करण्यात आलं आहे.  आता या स्पीकरला आपण अँड्रॉइड, iOS अॅपद्वारे नियंत्रित करू शकतो! ज्यामुळे गाणी निवडणं, प्लेलिस्ट तयार करणं अशा गोष्टी सहज करता येतील! Carvaan Premium रॉयल ब्ल्यू रंगात उपलब्ध असेल आणि याची किंमत ७३९० असेल  Rs.7,390.

काही दिवसांपूर्वीच यांचा Saregama Mini 2.0 हा ब्ल्यूटूथ स्पीकर आला होता ज्यात ३५१ हिंदी गाण्यांचा समावेश होता आणि याची किंमत २४९० होती.

ADVERTISEMENT

 Carvaan Premium मध्ये स्पीकर्सचा समावेश असून ५००० गाणी ह्यात आधीच जोडलेली आहेत. ५२ स्टेशन्स आहेत ह्याद्वारे आपण ठराविक गायकांची गाणी सहज ऐकू शकू. यामध्ये आता AM व FM ची सोय सुद्धा देण्यात आलेली आहे. AUX port द्वारे आणखी डिव्हाईस जोडता येतील! यामधील बॅटरी ५ तास टिकेल अशी माहिती देण्यात आली आहे.

search terms : Saregama Carvaan Premium Portable Digital Music Player Marathi

Exit mobile version