भारतीय पेमेंट कंपनी पेटीएमने नवं अॅप उपलब्ध करून दिलं असून जे नेहमीच्या पेटीएमपासून वेगळं असेल आणि या नव्या पेटीएम मनी अॅपद्वारे म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुक करता येईल! ४ सप्टेंबर पासून हे अॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध झालं आहे. मात्र कंपनीने सुरूवातीला दरदिवशी फक्त २५०० जणांचीच नोंदणी स्वीकारली असून लवकरच ही मर्यादा १०००० प्रतिदिन करण्यात येईल!
या नव्या Paytm Money कंपनीसाठी पेटीएमची मालकी असलेल्या One97 Communications कडून १० मिलियन डॉलर्स गुंतवण्यात आले आहेत. Paytm Money हा One97 Communications चा चौथा ब्रँड असेल.
पेटीएम मनीसाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता असून लाँचआधीच ८,५०,००० युजर्सनी यासाठी नोंदणी केली होती! ९६% नोंदणी मोबाईलमार्फत झाल्यामुळे सुरुवातीला केवळ अॅपवरच उपलब्ध असणार आहे.
Download Link : Paytm Money on Google Play | Paytm Money for iOS
प्रविण जाधव (पेटीएम मनी प्रमुख) : वापरकर्त्यांना गुंतवणुकीपूर्वी सर्व माहिती, त्यामध्ये घ्यावी लागणारी रिस्क याबद्दल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मदत केली जाईल. म्युच्युयल फंड स्कीम्समध्ये वेगाने अपडेट्स पुरवून सर्व आकडेवारी योग्य रित्या ग्राहकांना पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या प्लॅटफार्मवर दरदिवशी दहा लाख म्युच्युयल फंड व्यवहार करता येऊ शकतात!
पेटीएम मनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रथम अॅप डाऊनलोड करून घ्यावं लागेल. ह्यासाठी कोणतही शुल्क लागणार नाही. ज्याद्वारे आपल्याला २५ हून अधिक AMC (असेट मॅनेजमेंट कंपनी) चा अॅक्सेस मिळेल! मात्र जर तुम्हाला खात्री वाटत नसेल की कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी तर त्यासाठी MorningStar, CRISIL व Value Research यांची मदत पुरवली जाईल. या कंपन्या कामगिरीचा अभ्यास करून योग्य तो सल्ला देतील.
पेटीएम मनीद्वारे अगदी १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते! अधिकृत वेबसाइट
पेटीएम मनीच अॅप अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. अॅपमध्ये सध्या प्रवेश मिळवणं अवघड आहे कारण सुरूवातीला प्रतिदिन फक्त २५०० जणांनाच प्रवेश दिला जात आहे मात्र लवकरच अधिक जणांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश मिळालेल्या व्यक्तींना केवायसी कराव लागेल. तूर्तास पॅन, आधार, बँक अकाऊंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाईल.
पेटीएम मनीचा उद्देश भारतातील म्युच्युयल फंड गुंतवणुकदारांची संख्या येत्या तीन चार वर्षात दुप्पट करणे असा आहे असं सांगण्यात येत आहे.
search terms : what is paytm money marathi information mutual funds