नव्या आयफोनसाठी रांगेत थांबलेल्या अॅपल ग्राहकांना हुवावेकडून पॉवरबँक्स, ज्यूस!

होय नवा अॅपल आयफोन आला की तो सर्वात आधी माझ्याकडेच असावा या उद्देशाने बरेच लोक अॅपल स्टोअरबाहेर रांगा लावतात. ही रांग बराच वेळ चाललेली असते दरम्यान स्मार्टफोन विश्वातील आणखी एक आघाडीची कंपनी हुवावेने सिंगापूर येथे रांगेत थांबलेल्या iPhone XS घेणाऱ्या अॅपल ग्राहकांना चक्क पॉवरबॅंक्स वाटल्या! आणि त्यावर अस लिहून दिलं कि ‘तुम्हाला याची गरज पडेल!

सोबत हुवावेनेच लंडनमध्ये एक ज्यूस व्हॅन उभी केली ! जिथे ज्यूस आणि चार्जिंग पोर्ट्स उपलब्ध करून दिली होती!  पॉवरबॅंक्ससुद्धा थोड्याथोडक्या नव्हे तर 10000mAh च्या होत्या! यावर कंपनीची प्रतिक्रिया विचारताच तशा हवामानात रांगेत वाट पाहणं सुसह्य व्हावं ह्या उद्देशाने या पॉवरबँक दिल्याचं सांगण्यात आलं!      

   

अॅपलच्या चाहत्यांच वेड म्हणा किंवा आणखी काही पण अगदी पहिल्या आयफोनपासूनच बरेच लोक अॅपल स्टोअरच्या बाहेर रांगा लावून थांबतात. काही जण तर आधीच्या दिवशीच रांग सुरु करून त्या दिवशी तिथे रस्त्यावर राहण्यासाठी अंथरून-पांघरून, खाण्यापिण्यासाठी गोष्टी घेऊन मुक्काम करतात! विश्वास बसणार नाही पण जवळपास एक लाख रुपये किंमत असलेल्या या फोनचे ग्राहक रात्रभर रस्त्यावर काढतात! दुसऱ्या दिवशी हा फोन खरेदी करणाऱ्यांमध्ये मी पहिला होतो हे मिरवण्यासाठीच! मध्यंतरी तर काही लोक पैसे घेऊन दुसऱ्यांसाठी रांगेत थांबत असल्याच्या सुद्धा बातम्या आल्या होत्या. काल तर एकजण चक्क व्हीलचेअरवर सुद्धा येऊन थांबला असल्याचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. याबद्दल बरेच व्हिडीओ, फोटो बातम्यांमध्ये पाहायला मिळतात. आणि मग त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या अशा काहीतरी गंमती करून रांगेत थांबलेल्या लोकांना बर्गर, पाणी, पॉवरबँक किंवा थेट फोन्ससुद्धा वापरायला देतात!      

search terms : apple fans queue up for new iPhone XS 

Exit mobile version