फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी कार्डलेस क्रेडिट योजना सादर केली असून या अंतर्गत ग्राहकांना साठ हजार रुपयांपर्यंत क्रेडिट उपलब्ध होईल.ॲमेझॉनने सुद्धा दोन दिवसांपूर्वीच ॲमेझॉन पे ईएमआय सुविधा सादर केली होती, या योजनेला टक्कर म्हणूनच फ्लिपकार्टद्वारे कार्डलेस क्रेडिट योजना सादर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर सध्या फ्लिपकार्ट पे लेटर ही सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. ज्यायाद्वारे आपण खरेदी करताना फ्लिपकार्ट पे लेटर पर्याय निवडून फ्लिपकार्ट ने दिलेल्या मुदतीपर्यंत पैसे भरू शकतो.
कार्डलेस क्रेडिट सुविधा वापरण्यासाठी आपणाला पॅन कार्ड तसेच आधार कार्ड नंबर द्यावा लागेल व त्यानंतर ओटीपी द्वारे आधार नंबर व्हेरिफाय केल्यानंतर आपले ॲप्लिकेशन सबमिट केले जाईल. त्यानंतर आपणास उपलब्ध असणारे क्रेडिट लिमिट उपलब्ध होईल. आपण खरेदी करताना तीन ते बारा महिन्यांच्या ईएमआयचा पर्याय निवडू शकता किंवा पुढील महिन्यांमध्ये सुद्धा पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. कार्डलेस क्रेडिटचा पर्याय निवडल्यास आपल्याकडे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI सारख्या माध्यमातून ईएमआय भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल .
कार्डलेस क्रेडिट सुविधा सध्या फ्लिपकार्टने इन्व्हाईट केलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांचा फ्लिपकार्ट वरील इतिहास व इतर गोष्टींच्या आधारावर त्यांना या योजनेसाठी इन्व्हाईट केले जाईल. क्रेडिट कार्ड उपलब्ध नसणाऱ्या मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी या योजनेमुळे फायदा होईल.