फेसबुक वॉच आता जगभरात उपलब्ध : फेसबुकचा नवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म!

वर्षापूर्वी अमेरिकेत उपलब्ध करून दिलेली फेसबुक वॉच ही व्हिडीओ सेवा आता जगभरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. फेसबुक वॉचद्वारे वापरकर्त्यांना व्हिडीओ, कार्यक्रम, विविध क्रिएटर्स/सेलिब्रिटीजचे व्हिडीओ, बातम्या, खेळांचे सामने लाईव्ह तेसुद्धा फेसबुकवरच पाहता येतात. अलीकडे ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे कार्यक्रम, टीव्ही, चित्रपट अशी माध्यमे फोन्स, लॅपटॉप्सवर कुठेही उपलब्ध झाली आहेत. यामध्ये नेटफ्लिक्स, युट्यूब, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ यांनी आघाडी घेतलेली पाहून फेसबुकने सुद्धा त्यांचा स्वतःचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. या वॉच सेवेसाठी अॅपमध्ये स्वतंत्र टॅब दिलेली आहे. याबद्दल खाली पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कशा प्रकारे काम करेल हे पाहू शकाल…  

अधिकृत माहिती : Facebook Watch Is Going Global

या वॉच सेवेमध्ये आता काही शोज सुद्धा सुरु होत असून हॉलीवूड अभिनेत्री एलिझाबेथ ओल्सन हिची सॉरी फॉर युअर लॉस ही फेसबुक वॉच वरील पहिली मालिका असेल. बियर ग्रिल्सची फेस द वाईल्ड नावाची मालिका उपलब्ध होत आहे. यासाठी ABC, Fox News, Vice व Buzzfeed हे सुद्धा लवकरच त्यांचे व्हिडीओ कार्यक्रम उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.         



नवे व्हिडीओ पाहण्यासाठी : मनोरंजन, खेळ, बातम्या अशा क्षेत्रातील नवे व्हिडीओ लगेच पाहता येतील!
क्रिएटर मंडळींचे व्हिडीओज : तुमच्या आवडत्या क्रिएटर्सचे व्हिडीओ प्रथम पाहता येतील अशा सोयी. आपण फॉलो करत असलेल्या पेजेसची वेगळी फीड आपल्याला वर पाहता येईल.
सेव्ह केलेले व्हिडीओ एकाजागी : वॉचमध्ये आपण सेव्ह केलेले व्हिडीओ पाहू शकतो. फेसबुक वापरताना वेळ नसल्यास आपण व्हिडीओ Save करून ठेवू शकतो. (डाउनलोड नव्हे)

search terms facebook watch on demand video service launched world wide what is facebook watch

Exit mobile version