तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो अॅपल एव्हेंट आज स्टीव्ह जॉब्स थिएटर क्युपरटिनो इथे पार पडला. Xs, Xs Max, Xr या नव्या आयफोन्स मध्ये अनेक सुधारणा जोडण्यात आलेल्या असून हे पूर्ण नवा फोन असण्यापेक्षा आयफोन टेनची सुधारित आवृत्ती म्हणता येतील. या तिन्ही फोन्समध्ये अॅपलची नवी A12 Bionic चिप असेल जो स्मार्टफोन्समधील सर्वात वेगवान प्रोसेसर आहे! आता हे अॅपल फोन्ससुद्धा ड्युअल सिम वापरू शकतील! यामधील एक eSIM असेल जी त्यांची स्वतःची संकल्पना असून यासाठी ऑपरेटरचा सपोर्ट लागतो. Xr हे या फोन्समधील स्वस्त मॉडल असून यामध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले मिळेल जो यामध्ये प्रथमच वापरला जात आहे. Xs Max ची स्क्रिन आजवर सर्वात मोठी आहे!
अॅपल वॉच ४ मध्ये मात्र बरेच नवे बदल पाहायला मिळतील! आता थेट ECG सुद्धा या स्मार्ट घड्याळामध्येच काढता येणार आहे! अॅपलची मोबाइल ओएस iOS आता जवळपास 2 Billions (२०० कोटी) डिव्हाइसेसवर सुरु आहे असं यावेळी सांगण्यात आलं!
पूर्ण कार्यक्रम १०८ सेकंदात पहा या व्हिडीओमध्ये : https://youtu.be/iol8n3m88SA
आयफोन टेन एस : iPhone Xs व iPhone Xs Max : उत्कृष्ट प्रोसेसर, कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्लेसह!
डिस्प्ले : 6.5‑inch (diagonal) all‑screen OLED Multi‑Touch display (Xs Max)
डिस्प्ले : 5.8‑inch (diagonal) all‑screen OLED Multi‑Touch display (Xs)
रेजोल्यूशन : 2688‑by-1242‑pixel resolution at 458 ppi (Xs Max)
रेजोल्यूशन : 2436‑by-1125‑pixel resolution at 458 ppi (Xs)
प्रोसेसर : A12 Bionic chip Next-generation Neural Engine
कॅमेरा : Dual 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
Telephoto: ƒ/2.4 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB
इतर : FaceID (डोळे स्कॅन करून फोन अनलॉक (फिंगरप्रिंट सेन्सर नाही त्याऐवजी Iris स्कॅनरचा वापर)
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 12
किंमत : iPhone Xs Max : $1099 पासून सुरु : भारतात ₹१,०९,९९०
किंमत : iPhone Xs : $999 पासून सुरु : भारतात ₹९९,९००
आयफोन टेन आर : iPhone Xr : नवा स्वस्त आयफोन !
डिस्प्ले : 6.1-inch (diagonal) all-screen LCD Multi-Touch display IPS
रेजोल्यूशन : 1792-by-828-pixel resolution at 326 ppi
प्रोसेसर : A12 Bionic chip Next-generation Neural Engine
कॅमेरा : Dual 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB
इतर : FaceID (डोळे स्कॅन करून फोन अनलॉक (फिंगरप्रिंट सेन्सर ऐवजी Iris स्कॅनरचा वापर)
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 12
किंमत : $749 पासून सुरू
यामध्ये अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या असून सध्या अॅपल वॉच सगळ्यात जास्त विकलं जाणारं घड्याळ आहे! आता नव्या मॉडलमध्ये आपण शिडीवरून पडताना सारख्या घटनांवेळी सुद्धा आपोआप ओळखून आपल्यासाठी मदत बोलवण्याची सोय यामध्ये आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आता या घड्याळात Electro Cardiogram म्हणजेच ECG सुद्धा काढता येईल! यामुळे डॉक्टरना आपला ECG कधीही काढून पाठवू शकाल आणि तात्काळ मेडिकल उपाय सुद्धा! या नव्या मॉडल्सची किंमत खालीलप्रमाणे :
GPS $399, Cellular $499, Series 3 आणि यासाठी WatchOS 5 अपडेट १७ सप्टेंबरपासून मिळेल!
search terms Apple Event iPhone Xs Xs Max Xr Apple Watch 4 launched