यूट्यूब अनेकांसाठी व्हिडिओ पाहण्याचे प्रमुख माध्यम, अनेकांचा बऱ्यापैकी वेळ यावर जातोच. गाणी, विनोदी कार्यक्रम, मदतीसाठी, एखादी गोष्ट कशी करायची असे किमान ४-५ व्हिडिओज सहज पाहिले जातातच.
मे मध्ये झालेल्या गूगल I/O मध्ये गूगलने काही टूल्स सादर केले होते जेणेकरून लोकांना तंत्रज्ञान वापराबद्दल माहिती मिळावी व यामुळे महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता यावं. त्याचाच एक भाग म्हणून गूगलने आता यूट्यूब अॅप वापराबाबत सर्व टूल्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ज्याद्वारे आपण किती वेळ व्हिडिओ पाहिले आहेत? याबद्दल माहिती मिळवता येईल तसेच वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिमाइंडर लावण्याची सोय, नोटिफिकेशन्सचा आवाज बंद करणे, अनेक ऐवजी एकच नोटिफिकेशन यांचा समावेश आहे.
तुम्ही प्रत्यक्षात किती वेळ व्हिडिओ पाहिले?
तुमचा किती वेळ यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात गेला हे प्रोफाइल मध्ये पाहता येणार आहे. दररोजच्या वेळेसोबतच मागील सात दिवसांमध्ये किती वेळ व्हिडिओ पाहण्यात घालवला हे सुद्धा याद्वारे समजणार आहे. खालीलप्रमाणे तुमची प्रोफाइल पाहण्यासाठी प्रथम अकाउंटवर जावे लागेल (उजव्या कोपऱ्यामध्ये आयकॉनवर क्लिक करून) यानंतर Time Watched वर क्लिक करून आपण प्रोफाइल पाहू शकता .
Account icon > Time Watched
ब्रेक घेण्यासाठी स्वतःला आठवण करून द्या
यूट्यूबवर जाणारा वेळ आपणास समजल्यानंतर वेळ कमी करण्यासाठी लिमिट_सुद्धा लावता येणार आहे. यासाठी Remind me to take a break वर क्लिक करून वेळ नोंदवता येईल. यानंतर आपण सेट केलेल्या वेळेवर यूट्यूब आपणास आठवण करून देईल.
याव्यतिरिक्त यूट्यूबकडून येणाऱ्या अनेक नोटिफिकेशन्स ऐवजी आपण दिवसातून एकदाच सर्व नोटिफिकेशन्स मिळविण्याचा पर्याय निवडू शकता. यानंतर यू ट्यूब सर्व नोटिफिकेशन्स एकत्र करून दाखवेल.
नोटिफिकेशन साऊंड बंद करण्यासाठी पर्याय_सुद्धा यामध्ये आहे जेणेकरून नोटिफिकेशन्समुळे आपले कामावरून लक्ष विचलित होणार नाही.
यावर्षी आलेल्या अँड्रॉइड ९ पायमध्ये Digital Wellbeing For Android चा समावेश असून आपण कोणत्या अॅपमध्ये किती वेळ घालवत आहोत हे पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्या वेळेचं नियोजन करण्यासाठी सुद्धा त्यांच्यातर्फे टूल्स उपलब्ध करून देण्यात आले असून याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.