व्हॉट्सअॅप आणि गूगलमधील नव्या करारामुळे आता आपल्या व्हॉट्सअॅप बॅकअपसाठी गूगल ड्राईव्हमधील फ्री कोटा वापरला जाणार नाही. थोडक्यात व्हॉट्सअॅप बॅकअपसाठी गूगल कडून अधिक स्टोरेज मिळणार आहे. गूगल ड्राईव्हवर आपल्या अकाउंटसाठी 15GB फ्री स्टोरेज उपलब्ध असते ज्यामध्ये आपण आपल्या फाईल्स, फोटोज् ठेवू शकता. त्या 15GB च्या मर्यादेमध्ये व्हॉट्सअॅप बॅकअप मोजला जाणार नाही आणि या बॅकअपसाठी अमर्याद स्टोरेज मिळेल! आपण ज्यावेळी व्हॉट्सअॅपमध्ये बॅकअपसाठी गूगल अकाउंटचा पर्याय निवडतो तेव्हा तो बॅकअप गूगल ड्राईव्हवर साठवला जातो मात्र तो आपल्याला ड्राईव्हमध्ये पाहता येत नाही व तो केवळ
व्हॉट्सअॅपमध्ये रिस्टोअर पर्याय निवडल्यावरच पाहता येतो!
परंतु पूर्वी असणारे जे व्हॉट्सअॅप बॅकअप एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत अपडेट केलेले नाहीत ते मात्र गूगल ड्राईव्ह मधून १२ नोव्हेंबर २०१८ पासून काढून टाकण्यात येतील. यामुळे स्वतः बॅकअप घेणे गरजेचे आहे अन्यथा गूगल ड्राईव्हवरून डिलीट केला जाईल.
आपण आपल्या व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेऊन गूगल ड्राईव्हवर ठेवू शकता जेणेकरून मोबाईल बदलला/नवीन घेतल्यास आपले आधीचे मेसेजेस आणि मिडिया फाईल्स पुन्हा ट्रान्स्फर करता येतील… तुमच्या व्हॉट्सअॅपचा बॅकअप गूगल ड्राईव्हवर साठविण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आपण खालीलप्रमाणे उपाययोजना करू शकता.
Settings > Chats > Chat backup यानंतर आपले गूगल अकाउंट सिलेक्ट करून अनुमती दिल्यानंतर आपला डेटा गूगल ड्राईव्हवर साठवला जाईल आणि जेव्हा आपण नवीन ठिकाणी व्हॉट्सअॅप इन्स्टॉल कराल त्यावेळी व्हॉट्सअॅप सुरुवातीला बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी विचारेल.
अधिकृत माहिती Backing up to Google Drive