गूगल फॉर इंडिया हा कार्यक्रम गूगलचे भारतीय वापरकर्त्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी आयोजित केला जातो. Google For India मध्ये यंदाच्या चौथ्या वर्षीही बऱ्याच नव्या गोष्टी आणल्या असून मराठी भाषेतही अनेक सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भारतीय भाषांमीध्ये कंटेंट उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गूगल अनेक प्रयत्न करत आहे. तर खालीलप्रमाणे आज विविध प्रकारच्या उत्पादनांविषयी माहिती देण्यात आली आहे त्यांची ओळख करून घेऊया…खाली दिलेले बदल काही दिवसात पाहायला मिळतील तर काही लगेचच याची नोंद घ्यावी…
गूगल असिस्टंट आता मराठीत उपलब्ध! : दैनंदिन जीवनात अनेक गोष्टीत मदत करणारा गूगलचा असिस्टंट भारतात इंग्लिश आणि हिंदीनंतर आता मराठी भाषेतसुद्धा उपलब्ध झाला आहे. हा वापरण्यासाठी तुमच्या गूगल सेटिंग्जमध्ये मराठी भाषा जोडावी लागेल त्यानंतर तुम्ही मराठीत विचारलेल्या मराठी प्रश्नांना मराठी भाषेतच उत्तरे मिळतील! आहे न कमाल! नक्की वापरुन पहा. याबद्दल आमचा व्हिडिओ
- गूगल असिस्टंट उघडा (Home बटन दाबून धरा / Ok Google म्हणा / डाऊनलोड करा व उघडा
- त्यानंतर उजव्या कोपर्यात
More Settings - Devices मध्ये जा आणि तुमचा फोन निवडा
- Assistant language निवडा आणि मग language preferences मध्ये जा
- Add language निवडून इथे मराठी (Marathi) निवडा
- प्रमुख भाषा म्हणून सेट करायचे असल्यास मराठी समोरील
Reorder पर्याय दाबून धरूनवर सरकवा - आता मराठी तुमच्या फोनमधील प्रमुख भाषा म्हणून वापरली जाईल!
गूगलचा मराठी असिस्टंट : Google Assistant in Marathi
गूगलचे भारतीय भाषांसाठी प्रयत्न :
- गूगलची सर्व प्रमुख उत्पादने ८ प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध!
- Gboard ५० भारतीय भाषा पुरवणारा एकमेव कीबोर्ड!
- ८ प्रमुख भाषांमध्ये व्हॉइस सर्चची सोय!
- गूगल सर्च फीड आता भारतीय भाषांमध्ये! : जी आपल्याला सर्व रिझल्ट्स वाचून दाखवेल! मराठीतही लवकरच उपलब्ध
- जाहिराती हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू मध्ये उपलब्ध (अद्याप मराठीत नाही!)
गूगलचे मराठी भाषेतले नवे पर्याय! :
- गूगल सर्च फीड आता मराठीत! : जी आपल्याला सर्व रिझल्ट्स वाचून दाखवेल! मराठीतही लवकरच उपलब्ध
- गूगल गो मराठी भाषेत उपलब्ध! : याद्वारे आता वेबसाईट्स मराठी भाषेत वाचून दाखवल्या जातील अगदी 2G नेटवर्क असल्यावरही !
- Definition : एखाद्या शब्दाची व्याख्या विचारण्याची सोय मराठी भाषेत सुद्धा! शब्दाचे उच्चार कसे करावे याबद्दलही मिळेल मदत!
गूगलने जाहीर केली खास माहिती :
- भारतात येत्या तीन वर्षानी इंटरनेट वापरकर्त्यामध्ये ४५% स्त्रिया असतील!
- २०१२ नंतर इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये चौपट वाढ!
- दरमहा प्रत्येक जण जवळपास 8GB इंटरनेट डेटा वापरत आहे !
- दरमहा ३९ कोटी भारतीय इंटरनेट ऍक्टिव्हली वापरत आहेत!
- व्हॉइस सर्च वापरणाऱ्यामध्ये २७०% वाढ!
- फोनवर वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटमध्ये ७५% व्हिडीओच पाहिले जातात!
- भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दोन वर्षात ५० कोटींवर पोहोचणार!
- ९५% व्हीडिओज स्थानिक भाषेत पाहिले जातात!
- दोन कोटी लोकांनी वापरला गूगल मॅप्सवरील टू व्हीलर मोड!
- २०१८ मध्ये ५ कोटी इमारतीची माहिती गूगल मॅप्सवर जोडली गेली आहे!
गूगल तेझ आता गूगल पे (Google Pay India) : UPI द्वारे पैसे देण्याची सोपी सोय देणाऱ्या तेझ सेवेचं आता गूगल पे मध्ये नामांतरण झालं आहे! तेझवरून तब्बल ७५ कोटी व्यवहार पार पडले आहेत! २ कोटी दरमहा वापर करत आहेत. लवकरच गूगलची ही सेवा पेटीएमप्रमाणे दुकानांमध्येही उपलब्ध होईल!
इंटरनेट साथी : गूगलचा टाटा ट्रस्ट सोबतचा उपक्रम जो ग्रामीण भागातील स्त्रियांना इंटरनेट विश्वाची ओळख करून देतो! ह्या क्षणी ५०००० हुन अधिक इंटरनेट साथी ज्यांनी दोन कोटी महिलांना इंटरनेटची ओळख करून दिली आहे!
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) मदत! : पुराबद्दल अचूक माहिती वेळेआधी पुरवली जाईल! ज्याठिकाणी अधिक नुकसान होऊ शकेल याचा अंदाज व्यक्त करणं, मदत अधिक लोकांपर्यंत जलद पोहोचवणे यासाठी पर्याय! यासाठी भारताच्या जल मंत्रालयासोबत भागीदारी!
प्रोजेक्ट नवलेखा : भारतातील प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या प्रकाशकांपैकी ९०% जणांची वेबसाईट नाही. त्यांचा कन्टेन्ट इंटरनेटवर आणण्यासाठी Navlekha हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे! ज्याद्वारे सोप्या पद्धतीने वेबसाइट तयार करणे, फ्री होस्टिंग, जाहिराती या सोयी मिळतील! यामुळे ऑफलाईन असलेले प्रकाशक ऑनलाईन आणण्यासाठी मदत होईल!
इतर महत्वाच्या घोषणा :
अँड्रॉइड गो पाय जाहीर : कमी क्षमतेच्या फोन्ससाठी अँड्रॉइडचं नवं व्हर्जन अँड्रॉइड गो पाय
Where’s My Train : या अॅपची गूगल असिस्टंटसोबत भागीदारी, प्रश्न विचारताच ट्रेनच्या जागेची माहिती!
रेडबस : RedBus या अॅपसोबत भागीदारी, बसच्या थांब्याबद्दल अलर्ट्स!
गूगल स्टेशन : पूर्ण झाल्यावर १ कोटी लोकांपर्यंत पोहचेल ही सेवा!
गूगलकडून केरळ पूरग्रस्तांसाठी दहा लाखांची मदत जाहीर!
Google’s India for India Video : https://youtu.be/MBe_z9TPmSg
search terms Google For India Google Assistant Now in Marathi Internet Saathis Using AI for flood perdition Project Navlekha Google Tez is now Google Pay India Android Pie Go