फ्लिपकार्टतर्फे आज ‘फ्लिपकार्ट प्लस’ मेंबरशिप प्रोग्रॅम सादर करण्यात आला असून या अंतर्गत फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना मोफत फास्ट डिलिव्हरी, फ्लॅश सेल वेळी प्राधान्य, कस्टमर सपोर्टमध्ये अग्रक्रम तसेच फूड, ट्रॅव्हल साईट्सवरील कूपन्स यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. अॅमॅझॉनच्या प्राइम मेंबरशीपला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ‘फ्लिपकार्ट प्लस’द्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा फ्लिपकार्टचा प्रयत्न असेल.
आपण केलेल्या प्रत्येक ऑर्डरवर (रिटर्न/कॅन्सल केलेल्या सोडून) फ्लिपकार्टतर्फे अकाउंटवर कॉईन्स (Coins) देण्यात येतील. आपण केलेल्या खरेदीच्या प्रत्येक २५० रुपयांसाठी आपणास १ कॉइन मिळेल आणि एका खरेदीवर आपण जास्तीत जास्त १० कॉईन्स अकाउंटवर मिळवू शकता. यासाठी कमीतकमी २५० ची खरेदी करणे आवश्यक असणार आहे. समजा तुम्ही ७५० ची खरेदी केली तर तुमच्या अकाउंट वर ३ कॉईन्स जमा होतील. तसेच एका ऑर्डरवर जास्तीत जास्त १० कॉईन्सचे बंधन असल्याने आपण ८००० ची खरेदी केली तरीसुद्धा आपणास १० कॉईन्स मिळतील.
अधिकृत माहिती : Flipkart Plus Know More
अशाप्रकारे आपल्या अकाउंट वर ५० कॉईन्स जमा झाल्यानंतर त्या कॉइन्सचा वापर करून आपण ‘फ्लिपकार्ट प्लस’ मेंबर होऊ शकतो. ही मेंबरशिप एका वर्षासाठी वैध असेल. हे कॉईन्स डायरेक्ट विकत घेण्यासाठी कोणतीही सोय नाही. आणि ही सदस्यता केवळ या कॉइन्सद्वारेच मिळेल!
‘फ्लिपकार्ट प्लस’चे सदस्य झाल्यानंतर आपणास मोफत आणि फास्ट डिलिव्हरी मिळेल. बिग बिलियन डे सारख्या सेल वेळेस फ्लिपकार्ट प्लसच्या सदस्यांना इतर ग्राहकांआधी खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त बुक माय शो, मेक माय ट्रीप, झोमॅटो, CCD, ixigo यांचे व्हाउचरसुद्धा मिळतील. यासोबतच आणखी ५० कॉईन्स वापरून हॉटस्टार (Hotstar) चे वार्षिक सबस्क्रिपशन सुद्धा घेता येणार आहे.
अॅमॅझॉन प्राइम मेंबरशिपच्या वार्षिक ९९९ फीच्या तुलनेत फ्लिपकार्टवर यासाठी पैसे आकारले
जात नसले तरी ग्राहकांना ५० कॉईन्ससाठी जास्त खरेदी करावीच लागणार आहे. थोडक्यात ५ वेळा २५०० पेक्षा जास्त किंवा ५० कॉईन्स होईपर्यंतची खरेदी आलीच! त्यामुळे ही सेवा केवळ म्हणायला मोफत असणार आहे!
फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांसाठी ऑफर्स : https://www.flipkart.com/vip/rewards
अधिकृत व्हिडिओ : Flipkart Plus – More for you always
अॅमॅझॉन प्राइम मेंबरशिप मध्ये ग्राहकांना फ्री डिलिव्हरी सोबतच, अॅमॅझॉन प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक यासारखे सर्व्हिस सुद्धा उपलब्ध आहेतच. काही दिवसांपूर्वीच अॅमॅझॉनने १२९ च्या मासिक प्लॅनद्वारे प्राइम मेंबरशिप उपलब्ध करून दिली आहे.
search terms : flipkart plus membership loyalty program launched how to register