शायोमीने आज माद्रिद स्पेन येथे झालेल्या कार्यक्रमात अँड्रॉइड वन आधारित दोन नवे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Mi A2 आणि Mi A2 Lite यांचं ग्लोबल लाँच आज करण्यात आलं असून यामधील Mi A2 भारतात उपलब्ध होणार आहे. AI चा वापर करून बॅटरी संबंधीत काही बदल केले असून आता या फोन्सची बॅटरी दिवसभर टिकेल असा दावा शायोमीने केला आहे. यामधील कॅमेरामध्ये सुद्धा कृत्रिमम बुद्धिमत्तेचा (AI) समावेश केला असून त्यांच्या नव्या अल्गोरिदममुळे चांगले फोटो व सेल्फी निघतील! या फोनमध्ये शायोमीने USB Type C प्रकारचा पोर्ट दिला आहे! ८ ऑगस्टला हा फोन भारतात सादर होईल.
Mi A2 भारतीय किंमत ₹१७,४९९ अॅमॅझॉनवर प्रि ऑर्डरसाठी उपलब्ध!
यामध्ये अँड्रॉइड वन आधारित ऑपरेटिंग सिस्टिम असल्यामुळे यामध्ये अँड्रॉइड अपडेट गूगलकडून पुरवले जातात. Mi A2 मध्ये नवा Snapdragon 660 तर A2 Lite मध्ये Snapdragon 625 वापरला आहे. या फोन्सच्या भारतातील किंमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत मात्र A2 Lite भारतात उपलब्ध होणार नाहीये.
Mi A2 Specifications:
डिस्प्ले : 5.99-inch 18:9 FHD+ (2160×1080) IPS LCD panel Gorilla Glass 5
प्रोसेसर : Octa-core Qualcomm Snapdragon 660
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 32/64/128GB
GPU : Adreno 512
बॅटरी : 3010mAh Battery Quick Charge 3.0 (USB-C)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One (Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 12MP (f/1.8, 1.25um) + 20MP (f/1.75) PDAF
फ्रंट कॅमेरा : 20MP (f/1.75) AI portrait mode LED Selfie light Beautify 4.0
रंग : Gold, Blue, Black
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Ambient Light Sensor, Compass, Gravity Sensor
इतर : Bluetooth 5.0, GPS, GLONASS
किंमती : EUR 249(4GB+32GB), EUR 279 (4GB+64GB) EUR 349 (6GB+128GB)
Mi A2 Lite Specifications:
डिस्प्ले : 5.84-inch 19:9 FHD+ (2220×1080) IPS LCD panel
प्रोसेसर : Octa-core Qualcomm Snapdragon 625
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32/64
GPU : Adreno 506
बॅटरी : 4000mAh battery Fast charging (5V/2A over Micro-USB)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One (Android 8.1 Oreo)
कॅमेरा : 12MP (f/1.8) + 5MP (f/1.8) PDAF
फ्रंट कॅमेरा : 5MP f/2.2 lens AI portrait mode Beautify 4.0
रंग : Gold, Blue, Black
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Ambient Light Sensor, Compass, Gravity Sensor
इतर : Bluetooth 4.2, GPS, GLONASS
किंमती : EUR 179(3GB+32GB), EUR 229(4GB+64GB)