व्हॉट्सअॅपवरवर पाठवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या, अफवांमुळे गेले काही दिवस होत असलेले गैरप्रकार पाहून एकाच वेळी अनेक ग्रुप्समध्ये मेसेज पाठ्वण्यावर व्हॉट्सअॅपकडून निर्बंध आणले जाणार आहेत.
अलीकडेच ह्यासाठी व्हॉट्सअॅपने दुसरीकडे पाठवलेल्या संदेशांना forwarded असं दाखवण्यास सुरुवात केली मात्र त्याने सुद्धा काही फरक पडल्याचं चित्र दिसत नाहीये. आता या पुढे आणखी काही पावले उचलली जाणार असून प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या पसरून घटना घडणे चांगली गोष्ट नाही.
आजपासून या नव्या निर्बंधांची चाचणी सुरु केली जात असून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्वाना लागू असेल. भारत हा असा देश आहे जिथे असे मेसेज, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे एकावेळी ५ ग्रुप्स/चॅट्समध्येच संदेश पाठवता येतील असे निर्बंध लागू केले जाणार आहेत. आणि सोबतच त्याचवेळी मीडिया मेसेजससमोरील Quick Forward बटनसुद्धा काढून टाकलं जाईल. आज एका ब्लॉग पोस्ट द्वारे व्हॉट्सअॅपने ही गोष्ट अधिकृतरित्या जाहीर केली आहे.
व्हॉट्सअॅपची अधिकृत ब्लॉग पोस्ट More changes to forwarding : WhatsApp Blog
व्हॉट्सअॅपकडून सुरक्षा आणि गोपनीयेतला प्राधान्य देण्याबाबत पुन्हा एकदा माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात भारतीय सरकारकडून व्हॉट्सअॅपला फेक न्यूज विरोधात पावले उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
search terms : whatsapp to limit message forwarding to 5 chats or groups to avoid incidents caused by fake news