ट्विटरने हजारो संशयास्पद अकाऊंट्स काढून टाकण्यास सुरुवात केली असून त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी नवे प्रयत्न करत हे पाऊल उचलल्याच सांगितलं जात आहे. आता लॉकड अकाऊंट्स फॉलोअर्सच्या संख्येमध्ये धरले जाणार नाहीत. यामुळे सर्वच प्रसिद्ध ट्विटर खात्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट झालेली लगेच दिसून येईल! ही घट एकूण संख्येपैकी ६% इतकी मोठी असू शकते!
ट्विटरवर अनेक यूजर्स ज्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत त्यांनी काही अनैतिक मार्ग अवलंबून फॉलोअर्स वाढवल्याच अनेकदा निदर्शनास आलं आहे. यामध्ये फेक/खोटी/ऑटोमेटेड अकाऊंट्स तयार करून असे फॉलोअर्स विकत घेतले जात आहेत आणि याचा वापर नंतर खोट्या प्रचारासाठी, एखाद्या कंपनीची इमेज तयार करण्यासाठी किंवा काही लोकांची फॉलोअर्सच्या संख्येवरून करियर घडवण्यासाठी सुद्धा केला जात आहे. संशयास्पद खाती ओळखण्यासाठी त्यांच्या खात्यावरून बॉट्सचा वापर करून कमी वेळात भरपूर ट्विट्स केल्या जाणं, अनेकांनी एकाच वेळी त्या ठराविक खात्याला ब्लॉक करणं या गोष्टींना ग्राह्य धरलं जातं.
गुरुवारपासून (१२/०७/२०१८) या नव्या प्रयत्नांची सुरुवात केली असून अनेकांचे फॉलोअर्स कमी झाल्याचे सेलेब्रिटीकडून ट्विट केलं गेलं आहे. दरम्यान काही जणांनी काहीही चुकीच केलं नसताना सुद्धा अकाऊंट लॉक झाल्याचं सांगितलं आहे अशावेळी अकाऊंट परत मिळवण सोप जाव म्हणून ट्विटरला फोन क्रमांक जोडून ठेवा जेणेकरून पासवर्ड रिसेट करणं सोपं जाईल.
लॉकड अकाऊंट्स म्हणजे काय : ज्यावेळी ट्विटरला एखाद्या खात्याच्या वागणुकीत बदल आढळतो त्यावेळी ते अकाऊंट लॉक करतात. ज्यांचं अकाऊंट आहे त्यांना याबाबत माहिती दिली जाते आणि जर त्यांनी त्यांच्या अकाऊंटची पडताळणी करून पासवर्ड रिसेट केला नाही तर ते अकाऊंट तसच लॉकड/बंद अवस्थेत राहतं आणि त्या यूजरला लॉगिन करता येत नाही! यामध्ये शक्यतो फेक अकाऊंट्सचा समावेश असतो.
याबद्दल ट्विटरकडून अधिकृत पोस्ट : Confidence in Twitter follower counts (By Vijaya Gadde : Legal, Policy and Trust & Safety Lead)
We are committed to building trust and encouraging healthy conversation on Twitter.Follower counts should be meaningful and accurate. We are removing locked accounts from follower counts.— Twitter (@Twitter) July 11, 2018
Serarch Terms Twitter removing locked accounts from follower counts.