भारत सरकारची नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी! : इंटरनेट सर्वांसाठी मुक्तच राहील!

काल टेलीकॉम मंत्रालयाकडून जाहीर केल्या गेलेल्या निर्णयानुसार नेट न्यूट्रॅलिटी या तत्वाला भारतामध्ये मंजूर केलं गेलं आहे. यामुळे भारतात सर्वांना समान असलेलं इंटरनेट वापरता येईल ज्यामध्ये कोणालाही झुकतं माप दिलेलं नसेल आणि सर्व वेबसाइट्स/अॅप्स वापरताना सर्व ISP (इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर)कडे समान वेग मिळेल आणि यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. मध्यंतरी काही कंपन्यांकडून ठराविक आयएसपीचा ठराविक प्लॅन घेतल्यावर काही वेबसाइट्स पाहता येतील (एयरटेल Zero व internet.org) असा प्रकार घडला होता त्यानंतर भारतात नेट न्यूट्रॅलिटीच्या मागणीने जोर धरला होता. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ? सारख्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील लेख वाचा…

नेट न्यूट्रॅलिटी बद्दल आमचा यापूर्वीचा लेख नेट न्यूट्रॅलिटी : एक गरज     

नेट न्यूट्रॅलिटीचं पालन न झाल्यास किंवा कोणत्याही आदेशाच उल्लंघन झाल्यास दंड आकाराला जाईल. याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे येणार्‍या काळात कळेलच. या निर्णयामुळे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कोणत्याही प्रकारचा कंटेंट पहाण्यासाठी त्यांच्या ग्राहकांसोबत पक्षपातीपणा करू शकणार नाहीत. मात्र remote surgery व autonomous cars सारख्या तंत्रज्ञानाला तूर्तास तरी या नेट न्यूट्रॅलिटी फ्रेमवर्कमधून वगळलं आहे!

ट्राय संस्थेने दिलेल्या सूचनांवर विचार करून टेलीकॉम कमिशन (TC) या केंद्रीय दूरसंचार मंत्रालया (DoT)अंतर्गत येणाऱ्या संस्थेने याबद्दल निर्णय आज माध्यमांसमोर मांडला. या बैठकीत नेट न्युट्रॅलिटीला मंजुरी देण्यात आल्याचे टेलीकॉम सेक्रेटरी अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले.

search terms net neutrality marathi Telecom Commission telecom policy TRAI DoT

आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा : 
मराठीटेक फेसबुक : मराठीटेक ट्वीटर : मराठीटेक इंस्टाग्राम 

Exit mobile version