सॅमसंगची जगातील सर्वात मोठी फोन निर्मिती फॅक्टरी भारतात नोएडामध्ये!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते आज नोएडातील सुमारे ३५ एकर क्षेत्रात सॅमसंगच्या या फोन निर्मिती फॅक्टरीचे उद्घाटन झाल आहे. फोन्सच्या निर्मितीसाठी बनवलेली ही फॅक्टरी जगातील सर्वांत फॅक्टरी आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया आवाहनाला प्रतिसाद म्हणून मेक फॉर इंडिया अंतर्गत हा प्रकल्प होणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे.

ही नवी फॅक्टरी(कारखाना) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सुरू केली जात असून सॅमसंगची सध्याची मोबाइल निर्मिती क्षमता ६.७ कोटींवरून थेट १२ कोटींवर नेईल (होय १२ कोटी फोन्सची निर्मिती!). गेल्या वर्षी जून महिन्यात दक्षिण कोरियाच्या या कंपनीने नोएडात ४९१५ कोटी गुंतवणार असल्याचे जाहीर केले होते. २०१६-१७ मध्ये सॅमसंगच्या एकूण ५०,००० कोटी उत्पन्नापैकी फक्त मोबाइलच्या विक्रीमधून ३७,००० कोटी कमावले होते!
१९९५ मध्ये नोएडामध्ये सुरु झालेल्या या प्लॅन्टच्या विस्तारीकरणामुळे सॅमसंगला बाहेरील पार्टस इथेच जोडून विक्री सुरु करता येईल!  

  

Exit mobile version