रिलायन्स जिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड सेवा सादर : सोबत जिओफोन २, गिगाटीव्ही, स्मार्ट उपकरणे

बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू असलेली रिलायन्स जिओ फायबर ब्रॉडब्रॅंड Jio GigaFiber सेवा आज सादर झाली असून  रिलायन्सच्या वार्षिक (AGM) कार्यक्रमात प्रमुख मुकेश अंबानी यांनी याची घोषणा केली.

  • रिलायन्स जिओने २१ कोटी पन्नास लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडला!
  • रिलायन्स जिओफोनचे सध्या २,५०,००,००० हून अधिक ग्राहक
  • लवकरच फेसबुक, व्हॉट्सअॅप, युट्युब जिओफोनवर उपलब्ध   
  •  जिओ गिगाफायबर सेवेमध्ये गिगाबीट पर सेकंड (Gbps) या वेगाने इंटरनेट!

जिओ गिगाफायबर सेवेमध्ये गिगाबीट पर सेकंड (Gbps) या वेगाने इंटरनेट वापरता येईल! यासाठी जिओ एक राऊटर देणार असून याला जिओ राऊटर म्हटलं जाईल. सोबत जिओ गिगाटीव्ही जो इंटरनेटद्वारे ६००+ अधिक टीव्ही वाहिन्या, लाखो गाणी, हजारो चित्रपट अशा मनोरंजन सेवा उपलब्ध करून देईल! हे सर्व UHD 4K रेजोल्यूशनमध्ये पाहता येईल! आपण रीमोटला बोलून आज्ञा (व्हॉइस कमांड) शकतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिओ गिगाटीव्ही द्वारे व्हिडिओ कॉल्स सुद्धा करता येणार आहेत! व्हर्च्युयल रियालिटी हेडसेट जोडून आभासी जगाची सफर सुद्धा घेता येईल!     
    
या ब्रॉडबँड सेवेसाठी १५ ऑगस्टपासून MyJio व jio.com वर नोंदणी सुरू होईल. या फायबर ब्रॉडबँडचे प्लॅन्स मात्र जाहीर करण्यात आले नाहीत. (Reliance Jio Fiber Broadband Plans : Yet to be announced)

JioPhone 2 Specs and Price :
डिस्प्ले : 2.4″ QVGA
रॅम : 512MB
बॅटरी : 2000mAh
स्टोरेज : 4GB + 128GB SD Card Support
कॅमेरा : 2MP फ्रंट कॅमेरा : VGA
किबोर्ड : Qwerty Keypad
इतर : VoLTE, VoWiFi, FM Radio, WiFi, GPS, NFC, Dual SIM, EMBMS 
किंमत : ₹२९९९ उपलब्धतता : १५ ऑगस्टपासून MyJio वर नोंदणी सुरू
जिओफोन मान्सून हंगामा ऑफर असून यामध्ये २१ जुलैपासून जुना फीचर फोन एक्सचेंज करून नवा जिओफोन ५०१ रुपयांमध्ये मिळेल! 

Jio Smart Home Accessories 

या घोषणांसोबत जिओ स्मार्ट होम उपकरणे सुद्धा जाहीर करण्यात आहेत. यामध्ये Smart Speaker, Audio Dongle, Video Dongle, WiFi Extender, Smart Plug, TV Camera, Outdoor Camera अशी स्मार्ट उपकरणे उपलब्ध होतील ज्याद्वारे घरातील जवळपास सर्व गोष्टी स्मार्ट सुविधांद्वारे वापरता येतील. उदा एसी, टीव्ही, दरवाजे, सेन्सर फोनद्वारे नियंत्रित करता येतील!     

search terms Reliance Jio JioPhone 2 JioGigaFiber GigaRouter GigaTV SetTopBox WiFi 

Exit mobile version