आज रात्री येत्या १०० वर्षातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण…!

आज रात्री चंद्रग्रहण पाहायला मिळणार असून इतका वेळ सुरू राहणारं चंद्रग्रहण यानंतर थेट २१२३ या वर्षीच घडणार असल्यामुळे येत्या १०० वर्षातील सर्वात मोठ चंद्रग्रहण आज पाहता येईल! संपूर्ण भारतभर हे उत्तमरीत्या दिसणार असलं तरी ढगांमुळे थोडाफार व्यत्यय येऊ शकतो. 

तरीही तुम्हाला जर प्रत्यक्ष चंद्र ग्रहण पाहणं शक्य नसेल तर खालील लिंक्सवर जाऊन विविध ठिकाणांहून लाईव्ह पाहता येईल! यूट्यूबवर विविध चॅनल्सवर लाईव्ह स्ट्रीमची सोय करण्यात आली असून आपल्याला विश्वासू वाटणार्‍या चॅनलकडे आज रात्री ११:५४ वाजता हे ग्रहण पाहता येईल!

चंद्रग्रहण अशा प्रकारे दिसेल  
  • चंद्रग्रहण एकूण १ तास ४३ मिनिटे एव्हढा वेळ दिसेल! ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटे
  • २७ जुलै २०१८ रोजी ११:४४ वाजता सुरुवात होईल 
  • रात्री १:१५ ते २:४३ (२८ जुलै) खग्रास स्थितीमध्ये असेल आणि पहाटे ३:४९ ला ग्रहण समाप्त होईल!  
  • ह्या ग्रहणादरम्यान चंद्र blood moon प्रकारचा असेल त्यामुळे तो चंद्र लाल रंगाचा दिसेल 
  • चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त साधनाची गरज नाही.
    दुर्बिण असेल तर अधिक स्पष्टपणे पाहू शकाल.
  • या वर्षी जानेवारीत सुद्धा चंद्रग्रहण पाहायला मिळालं होतं!     
  • भविष्यात कधी ग्रहणे पाहायला मिळू शकतील याबद्दल माहितीसाठी वेबसाइट  

चंद्रग्रहण २०१८ लाईव्ह स्ट्रिम लिंक्स : NASA TV timeanddate    

search terms : Deep Red Blood Moon July 27 2018 longest total lunar Eclipse

Exit mobile version