आधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा ?

व्हर्च्युअल आयडी तयार करून आपल्या आधार क्रमांकाला सुरक्षित पर्याय द्यायचा आहे? तर खालीलप्रमाणे मिळवा आपला व्हर्च्युअल आयडी.

आधारसाठी सुरक्षित पर्याय म्हणून व्हर्च्युअल आयडी हा आता सर्वांसाठी UIDAI तर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. इथून पुढे आपण आधार नंबर ऐवजी व्हर्च्युअल आयडी देऊन डॉक्युमेंट्स पडताळणी करू शकता जेणेकरून आपला आधार नंबर गोपनीय राहील आणि आपली डॉक्युमेंट पडताळणी सुद्धा पार पडेल.

व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय ? त्याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आता आपण पाहू व्हर्च्युअल आयडी कसा मिळवायचा…
प्रथम समोरील लिंक उघडून यूआयडीएआयच्या (UIDAI)अधिकृत वेबसाइट ला भेट द्या

त्यानंतर तुम्हाला वरीलप्रमाणे पर्याय येतील, तर तेथे आपला आधार क्रमांक भरा आणि पुढे दिलेला Security Code टाकून Send OTP वर क्लिक करा.

यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी येईल तो भरा… (हा फक्त आधारला जोडलेल्या फोन क्रमांकावरच येईल) यानंतर क्षणार्धात व्हर्च्युअल आयडी तुमच्या मोबाइल वर SMS द्वारे येईल.

इथून पुढे तुम्ही आधार नंबर ऐवजी व्हर्च्युअल आयडी वापरून वेगवेगळ्या ठिकाणी आधार कार्ड न देता Verification करू शकता. जेणेकरून आपली गोपनीयता जपली जाईल आणि तुमच्या आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर टाळता येईल!

ही सुविधा सुरक्षितता आणि गोपनीयता या दोन कारणांसाठी महत्वाची आहे. यामध्ये उदा. एअरटेलचं सिम खरेदी करण्यासाठीही गेला आहात तर तिथे तुम्हाला आधार क्रमांक विचारला जातो व त्यामुळे तो अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडे आपला आधार क्रमांक साठवला जातो. ज्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून जर तिथे व्हर्च्युअल आयडी वापरला तर त्यांना तो साठवून काहीच उपयोग होणार नाही कारण तो दुसऱ्यांदा कधीच वापरात येणार नाहीये! दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी आधार व्हेरीफिकेशन असेल तेव्हा दुसराच व्हर्च्युअल आयडी १६ अंकी दिलेला असेल तो वापरावयाचा आहे.
तसेच आपण व्हर्च्युअल आयडी हवा असेल तेव्हा नवीन सुद्धा तयार करू शकता.

लेखक : स्वप्निल भोईटे 


search terms how to create aadhar virtual id in marathi

Exit mobile version