क्वालकॉम (Qualcomm) स्मार्टफोन प्रोसेसर क्षेत्रातली आघाडीची कंपनी असून त्यांनी त्यांच्या स्नॅपड्रॅगन मालिकेतील मोबाइल स्मार्टफोन्समध्ये नवीन मॉडल्स जाहीर केली आहेत. 4xx व 6xx या मॉडेल्सचे प्रोसेसर शक्यतो स्वस्त आणि मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये वापरले जातात.
Snapdragon 632 याद्वारे Qualcomm Kryo CPU जो four performance cores आणि four efficiency cores आणेल जे fast web browsing, चांगला यूजर इंटरफेस आणि अधिक काळ चालणारी बॅटरी अशी वैशिष्ट्ये असलेली असतील. हा 24MP (single) 13MP (dual) कॅमेरा सपोर्ट करू शकेल. Snapdragon X9 LTE मोडेमची जोड देण्यात आली आहे.
Snapdragon 439 and Snapdragon 429 यांची कामगिरी सुद्धा आधीच्या मॉडल्सपेक्षा सुधारित असून यांना Snapdragon X6 मोडेमची जोड देण्यात आली आहे. यामुळे इंटरनेटचा वेग up to 150 Mbps असू शकेल. हे प्रोसेसरसुद्धा बॅटरीच्या दृष्टीने अधिक चांगलं काम करतील!
यासोबत Snapdragon Wear 2500 सुद्धा जाहीर करण्यात आला असून हा मुख्यतः लहान मुलांच्या स्मार्टवॉचसाठी आहे.
search terms qualcomm snapdragon 632 439 429 smartphone processor CPU GPU