भारताच्या टाइम्स इंटरनेटने व्हिडिओ प्लेयर अॅप MX Player विकत घेतलं !

भारतातील प्रसिद्ध माध्यम समूह टाइम्सच्या डिजिटल विभागाने एमएक्स प्लेयर हे लोकप्रिय व्हिडिओ प्लेयर अॅप १००० कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे!

टाइम्स इंटरनेटच्या यापूर्वीच्या BoxTV.com ला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने २०१६ मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र आता या नव्या अधिग्रहणाद्वारे वेगळा विचार करू हे अॅप हजार कोटीना ($144 Millions) खरेदी करण्यात आलं आहे. एमएक्स प्लेयरचे डेव्हलपर्स मूलतः कोरियाचे असून हे अॅप भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास प्रत्येक अँड्रॉईड फोन धारकाकडे हा प्लेयर असतोच.  त्यांच्या एकूण ५०० मिलियन डाऊनलोड्स पैकी ३५० मिलियन एकट्या भारतातून येतात!

आता यामध्ये स्ट्रिमिंग सर्व्हिसची जोड देण्याचं टाइम्स ग्रुपने ठरवलं आहे! ऑगस्ट दरम्यान ही सेवा सुरू होईल. यावेळी किमान २० स्वतःचे कार्यक्रम आणि ५०००० कंटेंट दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 
सध्या  भारतात अनेक स्ट्रिमिंग सेवा जसे की नेटफ्लिक्स, अमॅझॉन प्राइम, हॉटस्टार, व्हुट, सोनीलिव्ह, जिओटीव्ही इ. वापरात आहेत पण सुरूवातीलाच मोठा युजर बेस असल्यामुळे एमएक्स प्लेयर पुढे असेल. दरम्यान सध्याची ऑफलाइन व्हिडिओ पाहण्याची सोय सुद्धा उपलब्ध असेलच. तरुणांसाठी खास कंटेंट तयार करण्यावर त्यांचा भर असेल. एमएक्स प्लेयर सीईओ कारण बेदी आणि टाइम्स इंटरनेटचे एमडी सत्यन गजवाणी यांनी याबाबत टेकक्रंचसोबत वार्तालाप करताना ही सर्व माहिती सांगितली. 

search terms mx player android video player download free times group 

Exit mobile version