काल झालेल्या कार्यक्रमात इंस्टाग्रामने त्यांची नवी व्हिडिओ सेवा जाहीर केली जी त्यांच्या सध्याच्या क्रिएटर मंडळींना १ तास लांबीचे मोठे उभे व्हिडिओ पोस्ट करण्याची सुविधा देईल! सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या कार्यक्रमात सीईओ केव्हीन सिसट्रॉम यांनी याबद्दल माहिती दिली.
या नव्या सेवेमुळे यूट्यूबला आता नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. ट्विच या गेम स्ट्रीम सेवेमुळे थोड्या प्रमाणात का होईना आव्हान निर्माण व्हायला सुरुवात झालीच होती कि आता या नव्या मोठ्या आधीच लोकप्रिय अॅपने त्यांच्या यूजरसाठी जास्त लांबीचे व्हिडीओ पोस्ट करण्याची सोया दिली आहे त्यामुळे आता या नव्या सेवेद्वारे आपला स्वतःचा प्रेक्षक निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमानावर कंटेन्ट पोस्ट केला जाण्याची शक्यता आहे.
आता इंस्टाग्रामवरील क्रिएटर ज्यांना आपण फॉलो करतो ते चॅनलप्रमाणे काम करतील त्यामुळे त्यांचे नवे व्हिडिओ वेगळ्या लिस्ट मध्ये पाहता येतील! यासाठी एक स्वतंत्र अॅप असेल जे उघडताच व्हिडिओ सुरू होतील. आपण स्वतःचे चॅनल सुरू करून व्हिडिओ अपलोड करू शकतो! ही सोय डेस्कटॉपवर सुद्धा उपलब्ध आहे!
अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक : Welcome to IGTV
IGTV डाऊनलोड लिंक्स :
यावेळी इंस्टाग्रामकडून असं सांगण्यात आलं आहे की त्यांचे तब्बल दरमहा १०० कोटी अॅक्टिव युजर झाले आहेत! म्हणजे इतके लोक त्यांच्या फोन्सवर इंस्टाग्रामचा दरमहा वापर करत आहेत! स्नॅपचॅटचे दैनंदिन युजर्स या चौमाहीमध्ये २.१३ टक्क्यांनी वाढले आहेत तर फेसबुकचे ३.१४ टक्क्यांनी. त्याचवेळी इंस्टाग्राम मात्र जवळपास ५ टक्क्यांनी वाढ नोंदवत आहे!
search terms IGTV info what is igtv how to use igtv igtv marathi