E3 (Electronic Entertainment Expo) या गेमिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात गेमिंग व्यवसायामधील मोठी नावं त्यांच्या गेम्स आणि त्यावर आधारित उपकरणं जगासमोर आणत असतात. सध्या कार्यक्रम Los Angeles येथे सुरू असून काल मायक्रोसॉफ्टने त्यांच्या एक्सबॉक्स कॉंन्सोलसाठीच्या गेम्स सादर केल्या!
दरम्यान मायक्रोसॉफ्टने चार गेमिंग कंपन्या अधिग्रहित करून स्वतःचा गेमिंग स्टुडिओ (The Initiative) सुरु करण्याचं जाहीर केलं आहे! सोनीच्या प्लेस्टेशनला exclusive गेम्स बाबत मागे टाकणं हे मायक्रोसॉफ्टचं पुढचं लक्ष्य दिसत आहे. सोबत नवी स्ट्रीमिंग सेवा आणि नवा कॉन्सोलसुद्धा आणत असल्याचं सांगितलंय !
खाली सर्व प्रमुख गेम्सच्या ट्रेलर्सच्या लिंक्स दिल्या आहेत. त्याद्वारे या गेम्सची झलक पाहू शकता.
Forza Horizon 4 – E3 2018 – Announce Trailer : https://youtu.be/VmQNo8xtcAg
Halo Infinite – E3 2018 – Announce Trailer : https://youtu.be/fzwddyOeiXo
Cyberpunk 2077 official E3 2018 trailer : https://youtu.be/8X2kIfS6fb8