विकिपीडियाची भारतीय भाषांमधील लेखांसाठी प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा !

अलीकडच्या काळात भारतामध्ये वाढलेले इंटरनेट यूजर्स आणि त्यांची भारतीय भाषांमधील Content ची मागणी लक्षणीयरित्या वाढलेली आहे. मात्र त्या प्रमाणात विकिपीडिया या मुक्तस्रोतामध्ये भारतीय भाषांमधील लेख फारच कमी प्रमाणात दिसून येतात. म्हणूनच त्यांनी आता एका स्पर्धा घेऊन त्याद्वारे भारतीय भाषेत लेख लिहिण्यास प्रोत्साहित करण्याचं ठरवलं आहे. 

प्रोजेक्ट टायगर या नावाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असुंयामध्ये विकिपीडिया, गुगल, सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी अशा संस्थांनी भाग घेतला आहे.  विकिपीडियावर तब्बल २३ भारतीय भाषांमध्ये लिहिण्याची सोय आहे! मात्र आता लेखक आणि त्यानुसार वाचक यांची कमी असलेली संख्या वाढवण्यासाठी हा उपक्रम कार्य करेल.  यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी नवे लेख, जुन्या लेखात सुधारणा, भाषांतरित करणे ज्यांमध्ये किमान ३०० शब्दांचा समावेश असावा अशी अट आहे.
३१ मे २०१८ रोजी विजेते घोषित केले जातील आणि त्यांना विविध स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसमध्ये सहभागी होता येईल जेणेकरून ऑनलाईन एडिटिंग सुधारता येईल.
ही स्पर्धा पुढील भाषांमध्ये सुरु झाली आहे : मराठी, तामिळ, कन्नड, बंगाली, तेलूगू, पंजाबी, ओडिया, मल्याळम आणि गुजराती.

ADVERTISEMENT

बक्षिसे : दर महिन्याला तीन वैयक्तिक पारितोषिके महिन्याच्या योगदानाबद्दल ३०००, २००० व १००० अशा रोख रकमेची असतील.

नियम, बक्षिसे यांबद्दल अधिकृत माहिती : विकिपीडिया प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

याद्वारे गूगलने सुद्धा युट्युबवरील खोट्या गोष्टी पसरवणाऱ्या व्हिडीओज बाबत कार्यवाही स्वरूपात त्या विषयासंबंधित लेखांना लिंक करण्याचं प्रयोजन केलं आहे! यामुळे देशातील यूजर्सची फेक व्हिडीओद्वारे फसवणूक/ चुकीची माहिती मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी लिंक्स  :
Supporting_Indian_Language_Wikipedias_Program
विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

search terms Wikipedia project tiger Indian languages Marathi Google

Exit mobile version