एएमडी रायझन 2nd Gen प्रोसेसर सादर : Ryzen 5 2600, Ryzen 7 2700X

AMD कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध रायझन (Ryzen) प्रोसेसर मालिकेत आता नव्या प्रोसेसरची जोड देत यांच्या किंमती आणि उपलब्धता सुद्धा जाहीर केली आहे. आता सर्वत्र Pre Order साठी उपलब्ध झाले असून प्रत्यक्षात १९ एप्रिलपासून मिळतील. 

AMD Ryzen 2000 series, base clock speed आणि त्यांच्या भारतीय किंमती :
Ryzen 5 2600 6 Core 12 Threads 3.4GHz : ₹12,990
Ryzen 5 2600X 6 Core 12 Threads 3.6GHz  : ₹15,990
Ryzen 7 2700 8 Core 16 Threads 3.2GHz : ₹20,490
Ryzen 7 2700X 8 Core 16 Threads 3.7GHz : ₹24,490

इंटेलच्या प्रोसेसरना स्वस्त आणि मस्त अशा प्रकारचे पर्याय AMD उपलब्ध करून देते. प्रोसेसिंग पॉवरच्या बाबतीतसुद्धा हे नवे प्रोसेसर किंमतीच्या मानाने इंटेलच्या प्रोसेसरसोबत चांगलीच स्पर्धा करत आहेत!
हे नवे प्रोसेसर X470 AM4 chipset वर काम करतील. ज्यासाठी लवकरच नवे मदरबोर्डस उपलब्ध होतील. सर्व 2nd Gen प्रॉसेसर AMD Wraith Cooler सोबत येतील आणि यामध्ये AMD ची StoreMI storage acceleration technology उपलब्ध असेल जी SSD आणि हार्ड डिस्क यांची क्षमता जोडून एक सोपी वेगवान ड्राइव्ह बनवते!

search terms amd ryzen processor CPU second gen 2000 series marathi 

Exit mobile version