PUBG (प्लेयर अननोन बॅटलग्राउंड्स) ही सध्याची सर्वात प्रसिद्ध ऑनलाइन मल्टीप्लेयर पीसी गेम पीसी आणि एक्सबॉक्स नंतर आता अँड्रॉइड आणि iOS वर सुद्धा उपलब्ध झाली आहे! या गेमला गेमर मंडळींचा सध्या सर्वत्र मोठा प्रतिसाद लाभत असून जगभरात ‘एकाचवेळी’ जवळपास ३० लाख लोक ही गेम खेळत असतात!
काही दिवसापूर्वीच केवळ एक्सबॉक्सवर पन्नास लाख गेमर्स खेळत आहेत असं सांगण्यात आलं आहे!
या गेममध्ये सुरुवातीला ऑनलाईन खेळाडूंना पॅराशूटद्वारे मैदानात सोडलं जातं. वेगवेगळ्या बंदुका आणि इतर सामग्री मैदानात असलेल्या घरामध्ये किंवा इमारतींमध्ये सापडतात आणि मग स्पर्धकांनी एकमेकांशी स्पर्धा करून विजय मिळवायचा असतो. वास्तविक ग्राफिक्स मुळे ही गेम अधिकाधिक प्रसिद्ध झाली आहे मात्र अजूनही ही गेम पूर्णतः Optimized नाही! गेमच्या नावाचा उच्चार करताना पबजी असा केला जातो…!
PUBG डाऊनलोड लिंक्स :
PUBG on Google Play
PUBG on iOS
स्मार्टफोन्सच्या वाढत्या क्षमता जसे की रॅम, प्रॉसेसर यामुळे आता कॉम्पुटर/कॉन्सोलवरच्या गेम्ससुद्धा आहे तशा फोन्सवर उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यामुळे गेमिंगचा भन्नाट अनुभव कोठेही घेता येईल! या गेमची स्पर्धक फोर्टनाईट Fortnite (जी पीसीवर चक्क मोफत उपलब्ध आहे) सुद्धा लवकरच फोन्सवर उपलब्ध होणार आहे!