गोप्रो कंपनी अॅक्शन कॅमेरा साठी प्रसिद्ध आहे. जवळपास प्रत्येक वेळी अॅक्शन स्टाईल व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी गोप्रोच्याच कॅमेरांचा वापर होतो! काही महिन्यांपूर्वी GoPro Hero 6 आणि GoPro Fusion हे कॅमेरे सादर करण्यात आले होते. त्यावेळी भारतासारख्या बाजारपेठांसाठी गोप्रो उपलब्ध करून देण्याची घोषणा सीईओनी केली होती. त्यानुसार हा नवा GoPro Hero अमेरिकेत $199 मात्र भारतात १८९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर मिळेल! स्वस्त चिनी कॅमेरांऐवजी हा उत्कृष्ट गुणवत्तेचा नवा कॅमेरा उत्तम पर्याय ठरेल.
हा नवा कॅमेरा 1440p and 1080p at 60 frames per second मध्ये HD व्हिडीओ काढू शकतो. सोबत 10-megapixel चे फोटोसुद्धा काढता येतील. यामध्ये electronic video stabilization system चा अंतर्भाव आहे.
2-inch touch display, voice controls आणि waterproofing upto 30 feet. सोबत सध्या बाजारात उपलब्ध सर्व ऍक्सेसरीज ह्या सुद्धा कॅमेराला चालतील!
Hero 6 ची किंमत $400 असून त्यामधील बऱ्यापैकी सुविधांचा समावेश Hero मध्ये आहे मात्र काही गोष्टी वगळण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे : यामध्ये नसलेल्या गोष्टी : 4K रेकॉर्डिंग, ultra-smooth slow-motion, optical image stabilization
search terms GoPro Hero $199 action camera 2018