Redmi Note 5 Pro |
शायोमीच्या रेडमी नोट ४ या फोनला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर (२०१७ मध्ये भारतात सर्वाधिक विकला गेलेला फोन!) शायोमीने त्यांच्या भारतातील रेडमी या ब्रँडखाली आता या फोनची नवी आवृत्ती सादर केली आहे! रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो या दोन मॉडेल्सद्वारे कंपनीने स्वस्त स्मार्टफोन्समध्ये 18:9 aspect ratio असलेले फोन बाजारात उतरवले आहेत! या नव्या ट्रेंडमध्ये आता मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. रेडमी नोट ५ मध्ये म्हणावं तितकं वैशिष्ट्य नसलं तरी नोट ५ प्रो फोनला मात्र कॅमेरा व प्रोसेसरमुळे नक्की मोठा प्रतिसाद लाभेल. Snapdragon 636 असलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे !
२२ फेब्रुवारीपासून हे फोन फ्लिपकार्ट व mi.com येथे सेलद्वारे उपलब्ध होतील.
रेडमी नोट ५ प्रो सुविधा : Redmi Note 5 Pro Specs
डिस्प्ले : 5.99″ इंची, FHD+(2160×1080), 18:9 aspect ratio, 403ppi
प्रोसेसर : Snapdragon 636 Octa Core, Adreno 506 ग्राफिक्स, Kryo 260 CPU
रॅम : 4GB/6GB स्टोरेज : 64GB/64GB
मुख्य कॅमेरा : 12MP+5MP ड्युयल कॅमेरा, F2.2+F2.0 PDAF
फ्रंट कॅमेरा : 20MP SonyIMX376, Selfie LED
बॅटरी : 4000 mAh
ओएस : MIUI 9 (अँड्रॉइड नुगट)
इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, Beautify 4.0181g
किंमत : ₹१३,९९९ (4GB) । ₹१६,९९९ (6GB) फ्लिपकार्टवर उपलब्ध
Redmi Note 5 |
रेडमी नोट ५ सुविधा : Redmi Note 5 Specs
डिस्प्ले : 5.99″ इंची, FHD+(2160×1080), 18:9 aspect ratio, 403ppi
प्रोसेसर : Snapdragon 625, Adreno 506 ग्राफिक्स
रॅम : 3GB/4GB स्टोरेज : 32GB/64GB
मुख्य कॅमेरा : 12MP, F2.2 PDAF
फ्रंट कॅमेरा : 5MP, Selfie LED
बॅटरी : 4000 mAh
ओएस : MIUI 9 (अँड्रॉइड नुगट)
इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, 180g
किंमत : ₹९,९९९ (3GB) | ₹११,९९९ (4GB) फ्लिपकार्ट लिंक
Mi TV 4 |
Mi TV 4 : सोबत Mi ब्रॅंडखाली बर्याच प्रतिक्षेनंतर शायोमीने त्यांचे टीव्ही भारतात सादर केले आहेत!
हा जगातला सर्वात पातळ डिस्प्ले (4.9mm) असलेला LED टीव्ही असल्याचा दावा शायोमीने केला आहे! याची जाडी चक्क स्मार्टफोनपेक्षा कमी आहे! यामध्ये पॅचवॉल ओएस असून यामुळे त्यांच्या पार्टनर्सकडून सर्व अॅप्सचा कंटेंट सहज पाहता येईल! याची किंमत ₹३९,९९९ आहे! फ्लिपकार्टवर उपलब्ध
यामध्ये 55 इंची 4K डिस्प्ले, 2GB रॅम, 3 HDMI + 2USB पोर्ट्स, DualBand WiFi, इथरनेट, Bluetooth 4.0 चा समावेश आहे! ऑडिओ साठी डॉल्बी व DTS ऑडिओ चा समावेश, 64bit प्रोसेसर, हॉटस्टार, व्हुट, सोनी लिव्ह, हंगामा, झी५, TVF, अल्ट बालाजी यांचे चित्रपट मालिका यावर पाहता येतील! या स्मार्टटीव्हीमुळे सध्याच्या टीव्ही बाजारात प्रामुख्याने आढळणारे सॅमसंग, सोनी यांना मोठी स्पर्धा निर्माण होईल! आश्चर्याची गोष्ट म्हणजे Mi टीव्हीमध्ये सॅमसंगचे पॅनल आहेत. सॅमसंगच्या ५५ इंची टीव्हीची किंमत ८०००० आहे आणि एमआयच्या टीव्हीची ३९९९९…!
search terms redmi note 5 redmi note 5 pro review specs price availability sale