गूगलने इमेज सर्च मधून View Image चा पर्याय काढून टाकला!

गूगलची इमेज सर्च सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आतापर्यंत युजर्स कोणत्याही गोष्टीबद्दल सर्च करून त्याबद्दलची कोणतीही इमेज/फोटो view image पर्याय वापरून ती इमेज डाउनलोड करून साठवू शकत मात्र 
आता Visit हा पर्याय वापरून वेबसाइटवर जाऊनच इमेज/फोटो सेव्ह करावा लागणार.

यूजर्स कॉपीराइटचा विचार न करता सरळ सर्चमधूनच इमेज सेव्ह करून वापरू लागल्याने मूळ निर्मात्यांना त्याचा फटका बसू लागला. शिवाय लोक प्रत्यक्ष वेबसाईटवर जाण टाळू लागल्याचं निदर्शनास आल्यानं
Getty Images सोबत करार करून ते बटन काढून टाकण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे!
यामुळे आता अशा इमेजसर्च द्वारे आपल्याला फोटो दिसत असले तरी ते कमी गुणवत्तेचे दिसतील पूर्ण गुणवत्तेसाठी तो फोटो ज्या वेबसाईटवर आहे तिथे जावं लागेल.

search terms google image search view image button desktop 

Exit mobile version