हाइक मेसेंजर हा मेसेजिंगच्या जगात व्हॉटसअॅप, वुईचॅट, टेलीग्राम, व्हायबर, लाइन यांना उत्तम भारतीय पर्याय देतो. यामधील खास भारतीय यूजर्ससाठी दिलेली स्टीकर्सतर खास लोकप्रिय झाली होती! याच हाइकने आता टोटल (Total By Hike) ही सेवा सुरू केली आहे जी इंटरनेट डेटा नसतानासुद्धा इंटरनेट अॅप्स वापरण्याची सोय देणार आहेत! हाइक सीईओ केव्हिन मित्तल यांनी याबाबत आज घोषणा केली!
टोटल बाय हाइकबद्दल अधिकृत पोस्ट : Total By Hike
ही सर्व अॅप्स USSD वर आधारित आहेत (USSD आपण बॅलन्स तपासताना वापरत असतो). त्याप्रमाणे क्रमांक डायल करून आपण संदेश, रिचार्ज, क्रिकेट स्कोर, बातम्या, भविष्य, रेल्वेबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो! या सेवेसाठी एयरटेल, बीएसएनएल यांनी सहभाग दर्शवला आहे.ही सेवा या ऑपरेटर्सवर मोफत उपलब्ध आहे!
ही सर्व अॅप्स १ एमबीपेक्षा कमी जागा घेतील! हाइक वॉलेट यूपीआयचा वापर करून व्यवहार करेल!
टोटल बाय हाइकचं काम कसं चालेल याविषयी खालील व्हिडिओ पहा!