सॅमसंगचे नवे स्मार्टफोन्स : गॅलक्सी ऑन 7 प्राइम, ए ८ भारतात उपलब्ध!

सॅमसंगने मध्यम किंमतीच्या आणखी एका स्मार्टफोनची घोषणा केली असून गॅलक्सी ऑन 7 प्राइम असं या फोनचं नाव असणार आहे. हा फोन केवळ अॅमेझॉनवर उपलब्ध होणार असून २० तारखेपासून याची खरेदी करता येईल! हा फोन बर्‍यापैकी J7 Prime व On Nxt यांच्यासारखाच आहे यात नवी सोय म्हणजे सॅमसंग मॉल आणि सॅमसंग पे या दोन गोष्टी! या नव्या फोनची किंमत १२९९० आहे.

Samsung Galaxy On7 Prime on Amazon

सॅमसंग मॉल :  ह्या नव्या सोयीमुळे आपण पाहत असलेल्या वस्तूचा कॅमेरा द्वारे फोटो काढायचा सॅमसंग मॉल आपोआप ती वस्तू ओळखून आपल्याला त्याची ऑनलाईन किंमत दाखवेल मग आपण ती लगेच खरेदी करू शकतो! यासाठी आपण गॅलरीमध्ये आधीच असलेला फोटोसुद्धा वापरू शकतो!

सॅमसंग पे : याविषयी मराठीटेकचा लेख वाचा : सॅमसंग पे आता भारतात!

Samsung Galaxy On7 Prime :
डिस्प्ले : ५.५ इंची FHD डिस्प्ले 
प्रॉसेसर : 1.6 GHz Exynos Octa-Core processor
फ्रंट कॅमेरा : 13MP CMOS
बॅक कॅमेरा : 8MP CMOS, F1.9
रॅम : 3GB/4GB स्टोरेज: 32GB/64GB 
बॅटरी : 3300mAh
इतर : फिंगरप्रिंट स्कॅनर, सॅमसंग पे, सॅमसंग मॉल, 4G VoLTE
किंमत : १२९९० (3GB) आणि १४९९० (4GB)

यापूर्वी सादर झालेला गॅलक्सी A8 आणि A8 Plus आता भारतात उपलब्ध झाले आहेत!

यासोबत सॅमसंगने आता दक्षिण कोरियामध्ये होणार्‍या विंटर ऑलिंपिक्ससाठी त्यांच्या प्रसिद्ध गॅलक्सी Note 8 फोनची खास आवृत्ती सादर केली आहे!

Samsung Galaxy On7 Prime Mall Pay Note 8 Winter Olympics Special Edition

Exit mobile version