गूगल प्लेवर अॅप्ससोबत चित्रपट, गाणी, मासिके, पुस्तकेसुद्धा विकत घेता येतात! गूगल प्लेवर सध्या ई बुक्स मिळायची (ही पुस्तके विकत घेतल्यावर Google Play Books अॅपमध्ये कधीही वाचता येतात!) बरेच दिवस चर्चा सुरू होती की लवकरच ऑडिओबुक्ससुद्धा उपलब्ध होणार आहेत. तर गूगलने कालपासून ही ऑडिओबुक्स उपलब्ध करून दिली आहेत! पहिल्या ऑडिओबुक खरेदीवर ५०% सवलत सुद्धा मिळणार आहे! ही ऑडिओबुक्स अँड्रॉइड, iOS आणि गूगल होम उपकरणांमध्येसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत!
ऑडिओबुक : ऑडिओबुक म्हणजे नेहमीचीच पुस्तके मात्र ऑडिओ रूपात! आपण हे ऑडिओबुक विकत घ्यायचं आणि ते अॅपमध्ये सुरु करायचं, मग कॉम्पुटर/अॅप आपल्याला पुस्तक वाचून दाखवायला सुरु करतं.
आपण आपलं काम करत, फिरत फिरत किंवा व्यायाम करता करता किंवा निवांत एका ठिकाणी पडून सुद्धा या ऑडिओबुक्स ऐकण्याचा आनंद घेउ शकतो. बऱ्याच वेळा यासाठी खास व्यक्तींचा आवाजसुद्धा दिलेला असतो!
गूगलच्या ऑडिओबुक्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गूगल असिस्टंटला आपण विकत घेतलेलं पुस्तक ऐकवायला सांगू शकतो उदा. Ready Player One हे पुस्तक विकत घेतलं असेल तर “OK Google Read my book” अशी आज्ञा गूगल असिस्टंटला देऊ शकता, त्या पुस्तकाचे लेखक विचारू शकता, काही मिनिटानंतर वाचन थांबवायला सुद्धा सांगू शकता! लवकरच अँड्रॉइड ऑटोमध्ये सुद्धा ही सोय वापरता येईल. अँड्रॉइड ऑटो ही कार चालकांसाठी गूगलची सेवा आहे.