कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) या इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठ्या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफी क्षेत्रात सादर झालेली काही खास उत्पादने
DJI Ronin S : DSLR/मिररलेस कॅमेरासाठी डीजेआय या कंपनीचा गिम्बल जो देईल उत्तम स्टॅबिलायझेशन, ३ ऍक्सिस, प्रिसिजन कंट्रोल आणि मॅन्युअल फोकस कन्ट्रोलसुद्धा! याची किंमत अद्याप जाहीर केलेली नसली तरी फोटोग्राफर मंडळींमध्ये रॉनीन एस नक्की प्रसिद्ध होईल!
DJI OSMO Mobile 2 : स्मार्टफोनसाठी असलेला सर्वोत्तम गिम्बलची आता नवी आवृत्ती अली असून याची किंमत देखील पहिल्या मॉडेलपेक्षा कमी आहे! नव्या मॉडेलची बॅटरी लाईफ सुद्धा सुधारून आता १५ तासांपर्यंत करण्यात अली आहे. याची किंमत 129$ (₹ ८२००)
पॅनासॉनिक GH5s : पॅनासॉनिकच्या प्रसिद्ध GH5 कॅमेराची सुधारित आवृत्ती GH5s सादर !
आता कमी प्रकाशात अधिक चांगली फोटोग्राफी, Dual ISO 10.2-megapixel सेन्सर मात्र आता इन बॉडी स्टॅबिलायझेशन नाही! व्हिडिओ : https://youtu.be/2pnMi0CLF8w किंमत : ~₹१,६०,००० ($2499)
निकॉनची नवी टेलीफोटो लेन्स : AF-S Nikkor 180-400mm f/4E TC1.4 FL ED VR सोबत 1.4x teleconverter ! फुल फ्रेम कॅमेरासाठीची ही लेन्स DSLR सोबत वापरल्यास आणखी दूर पर्यंतची छायाचित्रे टिपता येऊ शकतात! या लेन्सची किंमत ~₹ ७,९२,०००($12399)
वेस्टर्न डिजिटल SSD : WD कंपनीने फोटोग्राफर्ससाठी खास SSD (सॉलिड स्टेट ड्राइव्ह) सादर केल्या आहेत!
My Passport Wireless SSD 250GB, 500GB, 1TB आणि 2TB मध्ये उपलब्ध होईल. यात 6700mAh बॅटरी असून यांची किंमत $230 ते $800 अशी आहे.