Lenovo Miix 630 |
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) या इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रमामध्ये झालेले काही खास लॅपटॉप. लॅपटॉपमध्ये फार काही नावीन्य नसलं तरी ग्राहकांना कमी आकारात अधिकाधिक सोयी देण्याचा प्रयत्न यावेळी दिसून येत आहे.
एसर स्विफ्ट ७ Acer Swift 7 : एसर कंपनीने पुन्हा एकदा जगातला सर्वात पातळ लॅपटॉप सादर केला आहे!
याची जाडी केवळ 8.98mm असून किंमत $1,699 (१,०८,०००) असेल. यामध्ये टचस्क्रिन असलेला एचडी डिस्प्ले, इंटेल Core i7 प्रोसेसर, विंडोज हॅलो, USB 3.1, 512GB SSD, आणि 4G LTE सुद्धा आहे!
Razer Project Linda |
रेझर लॅपटॉप : रेझर या कंपनीचा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर झाला होता. त्या फोनला असं भन्नाट रूप देत फोनचा लॅपटॉप बनवता येईल! या लॅपटॉपला स्वतः म्हणून काही नसलं तरी यामध्ये USB पोर्ट्स देण्यात आले आहेत बाकी सर्व काही रेझर फोनच्या हार्डवेअरवर चालेल! टचपॅडच्या जागी हा फोन बसवता येईल त्यानंतर फोनचा डिस्प्ले आणि लॅपटॉपचा डिस्प्ले Sync होऊन फोन लॅपटॉप प्रमाणे वापरता येईल!
Dell XPS 15 |