आधार कार्डच्या सुरक्षिततेसाठी आता व्हर्च्युअल आयडी हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधार वापरताना आधार क्रमांकाऐवजी दरवेळी बदलणारा व्हर्च्युअल आयडी देता येईल जेणेकरून आपल्या आधार बाबतची माहिती गोपनीय ठेवण्यास मदत होईल. गेल्या काही दिवसात आधार सुरक्षित नसून गोपनीयतेबाबत फारशी काळजी घेतली गेली नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता यूआयडीएआय या आधार नियमन संस्थेने व्हर्च्युअल आयडी सादर केला आहे.
व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय ? : हा एक असा १६ अंकी क्रमांक आहे जो दरवेळी बदलत राहील आणि तो प्रत्येक वेळी आपल्या मूळ १२ अंकी आधार क्रमांकाला जोडलेला असेल. व्हर्च्युअल आयडी हा तात्पुरता क्रमांक असेल जो एकदा वापरल्यास परत वापरता येणार नाही! आधार वेरिफिकेशन/पडताळणी करण्याच्या ठिकाणी हा व्हर्च्युअल आयडी क्रमांक दिला की पुढच्या वेळी दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आधार पडताळणी लागेल तेव्हा दुसरा व्हर्च्युअल आयडी तयार झालेला असेल आणि तो वापरता येईल!
आधार व्हर्च्युअल आयडीचा वापर करणं पूर्णतः ऐच्छिक असून जर तुम्हाला तो हवा असेल तरच तुम्ही वापरू शकता अन्यथा तुमचा नेहमीच १२ अंकी आधार क्रमांक चालेलच.
ही सुविधा सुरक्षितता आणि गोपनीयता या दोन कारणांसाठी महत्वाची आहे. यामध्ये उदा. एअरटेलचं सिम खरेदी करण्यासाठीही गेला आहात तर तिथे तुम्हाला आधार क्रमांक विचारला जातो व त्यामुळे तो अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडे आपला आधार क्रमांक साठवला जातो. ज्याचा गैर वापर होऊ शकतो. म्हणून जर तिथे व्हर्च्युअल आयडी वापरला तर त्यांना तो साठवून काहीच उपयोग होणार नाही कारण तो दुसऱ्यांदा कधीच वापरात येणार नाहीये! दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी आधार व्हेरीफिकेशन असेल तेव्हा दुसराच व्हर्च्युअल आयडी १६ अंकी दिलेला असेल तो वापरावयाचा आहे.
व्हर्च्युअल आयडी तयार कसा करायचा ? : यूआयडीएआयने यासाठी वेबसाईट, अॅप, आधार केंद्र इथे व्यवस्था केली आहे जी १ मार्च २०१८ पासून सुरु होईल.
वेबसाईट : resident.uidai.net.in
mAadhar अॅप : mAadhar on Google Play
search terms what is aadhar virtual id, VID, UIDAI