अलीकडे कमी क्षमतेच्या व 2G किंवा 3G वर असलेल्या फोन्सना अॅप/सेवा उपलब्ध करून देणं वाढीस लागलेल दिसतं. यामुळे कंपन्यांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं. गूगलने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अॅप्स सादर केली आहेत. आता ओला या प्रसिद्ध कॅब/टॅक्सी सेवेनं त्यांचं कमी जागा घेणारं Ola Lite अॅप सादर केलं आहे. यामुळे आता कमी जागेत हे अॅप इंस्टॉल करून हळू चालणार्या नेटवरसुद्धा कॅब बुक करता येणार आहे!
ओला लाइट सुविधा :
– ओला लाईट 1 MB पेक्षा कमी जागा घेतं
– टॅक्सी बुक करा सोप्या आणि वेगवान मार्गाने!
– कॅब बुक करण्याला आता कमी डेटा लागेल
– कॅब, ऑटो, सेडान बुक करण्यासाठी वापरता येईल
– 2G, 3G नेटवर्कवरसुद्धा चालेल!
– ओला अॅपवरील सर्व सुविधा ओला लाईटवर उपलब्ध!
– Ola Lite uses less than 1MB on your phone
– Book taxi online in a easy and fast way!