काही दिवसांपूर्वी काही यूजर्सनी अॅपल आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची कामगिरी फोन घेतल्यासारखी राहत नसून नंतर आपोआप कमी होऊ लागली असल्याच निदर्शनास आणल होतं. याबाबत ऑनलाइन फ्लॅटफॉर्मवर बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसापूर्वी जॉन पूल या गिकबेंच डेव्हलपरने आयफोन 6S आणि आयफोन 7 ची कामगिरी तपासून पाहिली आणि अशा निष्कर्ष काढला की खरच अॅपल 10.2.1 आणि 11.2.0 या iOS आवृत्तीमध्ये कामगिरी कमी केली आहे. काही जणांनी यानंतर असा अनुभव सांगितला की नवी बॅटरी बसवताच कामगिरी पुन्हा पहिल्यासारखी होत आहे! आयफोन्स मध्यंतरी आपोआप बंद होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर अॅपलने हे पाऊल उचलल्याच समजत आहे.
यावर अॅपलने असं स्पष्टीकरण दिलं आहे कि जुन्या आयफोन्सना अधिक आयुष्य लाभावे म्हणून बॅटरी जुनी असल्यास करंट (विद्युत प्रवाह) संबंधित अडचणीमुळे नवी बॅटरी बदलून बसवेपर्यंत काहीसा कमी वेगात व कमी ताकदीने चालेल असे बदल केले आहेत! गेल्या वर्षी आयफोन 6, 6S आणि SE वर असलेली ही सोय आता आयफोन 7 ला सुद्धा देण्यात आली आहे! सोबत यापुढील मॉडेल्सवर सुद्धा असाच बदल केला जाऊ शकतो असही सांगण्यात आलं आहे! अॅपलने त्यांच्या ग्राहकांनी नवा फोन घ्यावा यादृष्टीने असं करत नसून जुन्या लिथियम बॅटरी ग्राहकांनी बॅटरी बदलावी जेणेकरून त्यांचं आयुष्य वाढेल म्हणून असे केलं जात असल्याचं सांगितलं आहे!
Update (29/12/2017) : अॅपलने जुन्या आयफोन्सची कामगिरी जाणीवपूर्वक कमी केल्याबद्दल मागितली माफी! बॅटरी कमी किंमतीत बदलून देणार! काही ग्राहकांनी अॅपलविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे! अधिकृत पोस्ट https://goo.gl/CaaoiV
Apple confirms it slows down old iPhones