अॅपल WWDC17 : iOS 11, नवा iMac Pro, iPad Pro, MacOS High Sierra

अॅपल या आघाडीच्या कॉम्पुटर कंपनी वार्षिक डेव्हलपर कार्यक्रम पार पडला. गेले काही वर्षं अॅपलच्या उत्पादनांकडून त्यांची ज्यासाठी ओळख आहे तशा प्रकारची प्रॉडक्ट्स सादर केली जात नव्हती. क्रिएटर मंडळींचा सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या नव्या सर्फेस कॉम्पुटर्स कडे ओढा वाढलेला पाहून त्यांनी काल बऱ्याच गोष्टींनी सुधारणा करून नवे मॅक सादर केले आहेत. ५००० हुन अधिक डेव्हलपर्सच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला! अॅपल सीइओ टीम कुक आणि इतर अधिकाऱ्यांनी यावेळी डेमो दिले.
आज पाहूया काल आणलेल्या सर्व प्रॉडक्ट्स आणि अपडेट्सची थोडक्यात माहिती …

iMac Pro 2017

 १. अॅपल iMac Pro : आजपर्यंतचा सर्वात ताकदवान अॅपल कॉम्पुटर! यामध्ये रॅम 128GB पर्यंत, 4TB पर्यंत स्टोरेज, 22 Teraflops क्षमतेचे 18-core Xeon प्रोसेसर्स, चार Thunderbolt 3 पोर्ट्स, Data Transfer at 40Gb/s, 10Gb Ethernet, 44 million pixels, रेटिना 5K 500nits डिस्प्ले! याची किंमत  $5,000 (~ ₹३,२५,०००)!!!

Macbook running High Sierra MacOS

२.  High Sierra macOS : अॅपलची कॉम्पुटर ऑपरेटिंग सिस्टिम : सफारी ब्राउजर आता ८०% अधिक वेगात, महत्वाचे ई-मेल समोर दाखवले जातील आणि कमी जागा घेतील. नव्या मशीन लर्निंग सुविधांद्वारे फोटोज आपोआप क्रमाने लावून फोटोमध्ये कोण आहे त्यांना टॅग करून ठेवेल. अॅपल फाईल सिस्टिममध्येसुद्धा बदल फाईल सुरक्षिततेला प्राधान्य.

३. वॉचओएस WatchOS 4 : अॅपलची स्मार्टवॉचसाठीची ऑपरेटिंग सिस्टिम : आता यामध्येसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता/ Artificial intelligence चा समावेश. आपोआप दाखवेल आपल्याला साजेशी माहिती, कॅलेंडरवरील पुढील कार्यक्रम दाखवणे, आठवणी दाखवणे, हवामान दाखवणे यासाठी नव्याने अपडेट्स
Updated with iOS 11

४. iOS 11 : अॅपलची स्मार्टफोन आणि टॅबलेटसाठी ऑपरेटिंग सिस्टिम : या नव्या व्हर्जनमध्ये अॅपलने अनेक सुविधांची भर घातली आहे. मॅपमध्ये बदल, “Do not disturb while driving” जोडणी (गाडी चालवताना कोणत्याही प्रकारचं विचलन नको म्हणून आपोआप नोटिफिकेशन होल्डवर जातील), Files अॅपद्वारे फाइल्स पहा कोठेही!, नवीन डॉक, मल्टीटास्किंग, ड्रॅग आणि ड्रॉप (अनेक दिवसांची मागणी शेवटी पूर्ण), सुरवातीपासून डॉक्युमेंट स्कॅन साठी सोय!, नवं अॅप स्टोरसुद्धा !!!सिरी आता अधिक मदत करेल, आपले मित्र कोणतं संगीत ऐकत आहेत हे पाहून शेअर करता येईल! कंट्रोल सेंटर द्वारे सर्व टॉगल मेनू (Data, ब्ल्युटुथ, वायफाय, ब्राइटनेस कंट्रोल्स) एकत्र, QuickType keyboard, इ.

नवं अॅप स्टोअर : Today Tab, Games Tab आणि Apps टॅबद्वारे वर्गीकरण. नव्या सोयींमुळे अॅप सर्च अधिक सोपा रेटिंग्स आणि Review  वाचणं सोपं, Game of the Day आणि App of the Day चा समावेश. 

Apple iPad Pro 2017
५. आयपॅड प्रो २०१७ : अॅपलचा नवा टॅब्लेट : १०.५ इंची स्क्रिन, सर्वात वेगवान मॉडेल six-core A10X Fusion  चिप, LTE  मॉडेल्स, जगातला सर्वात प्रगत डिस्प्ले असल्याचा दावा, 120Hz रिफ्रेश रेट!, 2224×1668,  दहा तासांची बॅटरी लाईफ, 866Mbps Wi-Fi, 450Mbps via LTE, iOS ११ अपडेटद्वारे अॅपल पेन्सिलला अनेक नव्या सुविधा जसे की लगेच नोट्स घेता येणे, 12MP + 7MP कॅमेरे, 64GB मेमरी पासून उपलब्ध, $649 (~ ₹४२०००) 
Apple Homepod Speaker
६. अॅपल होमपॉड Apple HomePod : अनेक सुविधा असलेला अॅपलचा स्पीकर : गूगल होम आणि अॅमॅझॉन एको या होम असिस्टंटना अॅपलच उत्तर. यामध्ये सिरी या व्हॉइस असिस्टंटचा समावेश हा स्पीकर घरात एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा आपण घरातल्या कोणत्याही कोपऱ्यातून आज्ञा देऊन गाणी लावणे, हवामान विचारणे, इंटरनेट सर्च करणे, घरातील दिवे बंद चालू करणे, बातम्या ऐकवणे, टायमर लावणे, भाषांतर, खेळविषयक आणि अगदी सामन्यज्ञानसुद्धा! किंमत $350 (~₹ २३०००)
Exit mobile version