इंटेल या प्रॉसेसर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने नवा प्रॉसेसर सादर केला असून आजपर्यंतचा सर्वात ताकदवान सीपीयू मानला जात आहे. गेल्यावर्षी 10 Core असलेला प्रॉसेसर सादर केला गेला होता. त्यावर आणखी अधिक ताकदीसह हा नवा Intel i9-7980XE आणला आहे!
या प्रॉसेसरची किंमत $1999 (~ ₹1,30,000) आहे (होय फक्त प्रॉसेसरचीच किंमत!!!). यामुळे हा AMD या दुसर्या स्पर्धक कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या 16 Core Threadripper प्रोसेसरला मागे टाकून २०१७ चा सर्वात ताकदवान Cosumer प्रोसेसर बनला आहे! ज्या ग्राहकांना त्यांच्या कॉम्पुटरकडून खूप पॉवर लागणारी कामे करून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी 4K रेजोल्यूशन मध्ये गेम खेळणे व सोबतच त्या ट्विच/यूट्यूब सारख्या ठिकाणी ऑनलाईन स्ट्रीम करणे सहजशक्य होणार आहे.
अर्थात हा प्रोसेसर सामान्य पीसी/डेस्कटॉपमध्ये दिसणार नाही कारण हा केवळ अधिक ताकदीच्या कॉम्पुटरमध्येच वापरला जाईल! मुळात ही चिप सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेऊन बनवलेलीच नाहीये. गेमर्स, स्ट्रीमिंग करणारे, उच्च दर्जाचे ग्राफिक्स/व्हिडिओ एडिटिंग करणार्या लोकांना याचा मोठा फायदा होईल. याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा प्रोसेसर १ टेराफ्लॉप वेगाने कॉम्पुटिंग करणारा इंटेलचा पहिलाच Consumer प्रोसेसर आहे!
या प्रॉसेसरची आणखी काही कमी Core असलेली मॉडेलसुद्धा सादर करण्यात आली आहेत.
या प्रॉसेसरची इतर काही वैशिष्ट्ये :
i9 chips मध्ये 3.3GHz पर्यंत base clock speed असेल जो Turbo Boost 2.0 द्वारे 4.3GHz पर्यंत जाणारा dual-core speed आणि Turbo Boost 3.0 द्वारे 4.5GHz पर्यंत !