गूगल प्ले रिवॉर्ड्स अॅपद्वारे गूगल यूजर्सना सर्व्हे उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात त्यांना गूगल प्लेच्या स्टोअर, गेम्स, अॅप्स, गाणी, चित्रपट, मासिके खरेदी करण्यासाठी गूगल प्ले स्टोअर क्रेडिट/पैसे देते. हे अॅप आता भारतात सुद्धा उपलब्ध झाल असून भारतीय यूजर्ससुद्धा या अॅपमधील सर्व्हेमध्ये भाग घेऊन त्याद्वारे पैसे मिळवू शकतात आणि त्याचा उपयोग गूगल प्ले स्टोअरवर खरेदीसाठी करू शकतात.
हे अॅप डाऊनलोड करून Sign Up करा. समोर दिसतील त्या अटी मान्य करून पुढे जा. ज्या ज्या वेळी नवा सर्व्हे उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा नोटिफिकेशनमध्ये तसा संदेश दिसेल.
या अॅपमधील सर्व्हेमध्ये हा लोगो कसा वाटतो? डिझाईन छान का? कोणती जाहिरात चांगली वाटते ? यानंतर तुम्ही कुठे फिरायला जाणार आहेत असे प्रश्न विचारले जातील. यासाठी तुम्ही त्याजागी फिरायला गेला आहात त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातील. असा सर्व्हे उत्तरे देऊन पूर्ण झाल्यानंतर काही रुपये तुमच्या प्ले स्टोर क्रेडिट रूपात जमा झालेले दिसतील. हे पैसे तुम्ही गूगल प्ले स्टोरवरून अॅप्स, गेम्स, गाणी, चित्रपट, साप्ताहिके/मासिके खरेदी करण्यासाठी वापरू शकता! हे अॅप गूगल सर्व्हे टीमने तयार केलं आहे. २३ मे पासून हे भारतासोबत सिंगापूर आणि टर्कीमध्ये उपलब्ध केलं गेलं आहे.