फ्लिपकार्ट ह्या भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटने एक स्पर्धक इबे इंडिया (eBay) विकत घेतलं असून eBay या आंतरराष्ट्रीय कंपनीचा भारतातला कारभार आता फ्लिपकार्टकडे सोपवला जाणार आहे.
सोबतच फ्लिपकार्टने मायक्रोसॉफ्ट, Tencent आणि eBay यांच्या गुंतवणूकीच्या सहाय्याने तब्बल १४० कोटी डॉलर्स भांडवल उभारलं आहे. भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात उद्योगासाठी उभारलेलं हे सर्वात मोठं भांडवल आहे!
• मायक्रोसॉफ्ट तर आपणा सर्वांच्या परिचयाची सॉफ्टवेअर कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी सीईओ सत्या नाडेला आणि फ्लिपकार्ट सीईओ सचिन बन्सल यांची भेट झाली होती.
• Tencent ही चीन देशातील मोठी कंपनी असून भारत व जगातील बऱ्याच सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपनीने यापूर्वी SuperCell क्लॅश ऑफ क्लॅन्स, टेस्ला मोटर्स, WeChat, Hike मध्ये काही भाग अशा मोठमोठ्या गुंतवणुकी केल्या आहेत!
• eBay इबे ही जगातील आघाडीची ऑनलाईन शॉपिंग कंपनी असून त्यांनी फक्त भारतातील कारभार फ्लिपकार्टला विकला आहे. इबे इंडिया फ्लिपकार्टला विकून त्यांनी स्वतः पुन्हा फ्लिपकार्टमध्येच गुंतवणूकसुद्धा केली आहे!
फ्लिपकार्टने याआधी २०१५ साली भांडवल उभारलं होतं. सध्या Tiger Global Management, Naspers Group, Accel Partners and DST Global अशी मोठी नावं फ्लिपकार्टचे गुंतवणूकदार आहेत! २००७ साली फ्लिपकार्टची सुरुवात सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी केली होती.
इबेचा व्यवहार : ebay.in ची मालकी फ्लिपकार्टला 50 कोटी डॉलर्सना विकली असून eBay च्या आंतरराष्ट्रीय वस्तू फ्लिपकार्टवर तर फ्लिपकार्टवरील eBay वर उपलब्ध होतील. हा करार वर्षाच्या शेवटी पूर्ण होईल.
आता फ्लिपकार्टचं मूल्यांकन 1120 कोटी डॉलर्सवर पोचलं आहे! फ्लिपकार्टने यापूर्वी Jabong, ngpay, फोनपे, myntra, LetsBuy या कंपन्यांचं विकत घेऊन अधिग्रहण केलं आहे.
फ्लिपकार्ट संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल |
या बद्दल फ्लिपकार्ट सीईओ सचिन बन्सल यांचं ट्विट
Fantastic fusion of synergies!Tencent @eBay @Microsoft & @Flipkart! Giant leap for Indian ecommerce https://t.co/tNjd6phftC #FlipkartBigWin— Sachin Bansal (@_sachinbansal) April 10, 2017
आश्चर्याची गोष्ट म्हणजे eBay चा स्नॅपडीलमध्ये सुद्धा हिस्सा आहे. फ्लिपकार्ट लवकरच स्नॅपडीलसुद्धा विकत घेणार असल्याची शक्यता आहे! यामुळे इथून पुढे फ्लिपकार्टची प्रमुख स्पर्धा फक्त अॅमॅझॉनसोबतच असेल.