मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१७ कार्यक्रमाबद्दल : नोकियाचे नवे फोन सादर!

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस या मोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठ्या कार्यक्रमाची सुरवात यंदा २७ फेब्रुवारीपासून बार्सेलोना येथे झाली. नेहमीप्रमाणे आघाडीच्या कंपन्यांनी त्यांचे नवनवे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. मराठीटेकच्या फेसबुक पेजवर आणि ट्वीटरवर याचं लाईव्ह कव्हरेज आम्ही केलं होतं.
यामध्ये चर्चेचा विषय ठरलेले नोकियाचे अँड्रॉइड स्मार्टफोन सादर झाले आहेत. आजच्या या लेखामध्ये खाली सविस्तर जाणून घेऊया या सर्व स्मार्टफोन्सबद्दल…

नोकिया : नोकीयाने HMD Global या कंपनीला त्यांचं नाव वापरुन स्मार्टफोन्स बनवण्याबद्दल करार झाला असून त्याअंतर्गत तीन अँड्रॉइड स्मार्टफोन सादर करून बाजारात पुनरागमन केलं आहे. या तीन फोन्ससह त्यांनी जुन्या नोकिया 3310 या फोनला नव्या रूपात सादर केलं आहे. गुगलसोबत भागीदारीत त्यांच्या फोन्सवर अँड्रॉइडचे नियमित अपडेट देण्याचं जाहीर केलं आहे.

नोकिया 3 : हा या नव्या फोनमध्ये सर्वात स्वस्त फोन असून याबद्दल अधिक जाणून घ्या ह्या लिंकवर
नोकिया 5 : हा मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये प्रबळ दावेदार ठरेल याबद्दल अधिक जाणून घ्या ह्या लिंकवर
नोकिया 6 :  हा नोकीयाचा पुनरागमनानंतरचा सर्वोत्तम फोन असून याबद्दल अधिक जाणून घ्या ह्या लिंकवर   
नोकिया 3310 : या फोनद्वारे अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला असून याबद्दल जाणून घ्या ह्या लिंकवर

Samsung Galaxy Tab S3

सॅमसंग :  सॅमसंग यावेळी गॅलक्सी एस8 सादर करेल अशी शक्यता होती मात्र त्यांनी काही टॅब्लेट्सच सादर केले असून एस८ साठी त्यांनी २९ मार्चला न्यूयॉर्कमध्ये वेगळ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
सॅमसंगने Samsung Galaxy Tab S3 सादर केला  याची स्पर्धा थेट अॅपलच्या आयपॅड प्रो सोबत असेल. यामध्ये सुद्धा एस पेनचा सपोर्ट आहे. याबद्दल जाणून घ्या ह्या लिंकवर
यासोबत Samsung Galaxy Book हा विंडोज १० आधारित लॅपटॉपसुद्धा त्यांनी सादर केला आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या या लिंकवर

Sony Xperia XZ Premium

सोनी : सोनी कंपनीने सादर केलेल्या नव्या एक्सपिरीया स्मार्टफोनमध्ये बर्‍याच बाबतीमध्ये जगात सर्वप्रथम ठरवणारी फीचर्स दिली आहेत. 4K HDR (फुलएचडीच्या चौपट) डिस्प्ले असलेला जगातला सर्वात पहिला फोन असून यामध्ये चक्क 960 Frames per second ने व्हिडिओ काढता येतो! सोबत त्यांनी XZs,  XA1, XA1 Ultra हे फोन्ससुद्धा सादर केले आहेत.  याबद्दल अधिक जाणून घ्या या लिंकवर

Blackberry KEYone

ब्लॅकबेरी :  ब्लॅकबेरीने कीवन नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये टचस्क्रीनसोबत ब्लॅकबेरीचा प्रसिद्ध कीबोर्डसुद्धा देण्यात आला आहे! ब्लॅकबेरीचा प्रिव नंतर हा नवा प्रयत्न असून यासाठी TCL सोबत मिळून त्यांनी हा नवा फोन बाजारात आणला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी CES मध्ये मर्क्युरी नावाने ह्या फोनबद्दल काही माहिती जाहीर करण्यात आली होती. याबद्दल अधिक जाणून घ्या या लिंकवर

LG G6

एलजी : एलजी कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन G6 सादर केला असून जगातला पहिला 18:9 स्क्रीन रेशो असलेला फोन असून यामुळे फोनचा समोरील भाग फोनच्या डिस्प्लेनेच व्यापलेला दिसतो! यातच HDR व डॉल्बी व्हीजनचीसुद्धा जोड देण्यात आली आहे! याबद्दल अधिक जाणून घ्या या लिंकवर

Moto G5

मोटो : लेनेवोच्या मोटो कंपनीने त्यांच्या मोटो जी सिरीजमध्ये नवे फोन्स G5 आणि G5 प्लस सादर केले आहेत.
यावेळीसुद्धा माध्यम किंमतीच्या फोनचं मार्केट काबिज करण्याचं त्यांचं लक्ष्य असेल. याची मुख्य स्पर्धा शायोमी नोट 4 सोबत आहे. हे फोन भारतात १५ मार्चपासून उपलब्ध होतील! याबद्दल अधिक जाणून घ्या या लिंकवर

हयुवावे : हयुवावे P10 Plus जगातला पहिला 4.5G स्मार्टफोन सादर!
Huawei P10 या फोनमध्ये Leica Dual Camera 2.0 असून यामधील फ्रंट कॅमेरा सर्वोत्तम असल्याचा दावा हयुवावेने केला आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या या लिंकवर

इतर : ZTE कंपनीने Gigabit हा 5G compatible फोन सादर केला असून यामध्ये तब्बल 1Gbps चा डाऊनलोड स्पीड मिळत असल्याचा दावा ZTEने केला आहे!  

Exit mobile version