₹२००० आणि ₹५०० नव्या चलनी नोटा |
पंतप्रधान मोदींनी ८ नोवेंबरच्या रात्री भारतीय चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा बाद करण्याचा निर्णय जाहीर करून काळ्या पैशाच्या व्यवहारावर आळा घालण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. अनेकांना हा निर्णय धक्कादायक होता. सोबतच त्यांनी ५०० आणि २००० च्या नोटा जाहीर केल्या आणि येत्या काही दिवसात व्यवहार कसे पार पाडले जातील याविषयी योजना देशासमोर मांडली.
आजच्या लेखात पाहूया याची कारणे, परिणाम, उपलब्ध पर्याय…
नोटा रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला ?
जास्त रकमेच्या नोटांच्या नकली चलनाचा वापर वाढल्याच्या घटना घडत होत्या. सामान्यांसाठी, नकली नोटा खर्या नोटांसारख्याच दिसणार्या मात्र सुरक्षित सुविधा न पुरवलेल्या आहेत. ह्या नकली नोटा देशविरोधी आणि अवैध कामांसाठी वापरल्या जात होत्या. दहशदवादी आणि काळ्या व्यवहार करणार्याकडून यांचा वापर सहजशक्य होता. म्हणूनच ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करून गैरव्यवहारांना शह देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं. अर्थात यापूर्वीसुद्धा अनेक वेळा असे निर्णय घेण्यात आले आहेत.नोटांच्या गैरवापरामुळे ठराविक कालावधीनंतर चलनबदल करणं अपरिहार्य होऊन जातं.
सर्व रकमेच्या नोटा रोख बदलून मिळतील का ?नाही. एका व्यक्तीला ₹४५०० रूपयापर्यंतच नोटा बदलून मिळतील.
४५०० पेक्षा जास्त रकमेची गरज असल्यास बँक खात्यामध्ये कितीही रक्कम भरू शकता मात्र वापर करताना खालील पर्याय उपलब्ध असतील.
▸चेक, इलेक्ट्रॉनिक पद्धती (इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/IMPS/मोबाइल वॉलेट)
याचाच अर्थ पैसे बँक खात्यात भरण्यासाठी मर्यादा नाही मात्र नव्या नोटा बदलून रोख रक्कम मिळवण्यासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहे.
• RBI च्या सर्व शाखा, ग्रामीण बँकांच्या शाखा,
• शहरी को-ऑपरेटिव्ह बँका (Urban Cooperative Banks)
• मुख्य आणि उप पोस्ट ऑफिसेस (Post Offices)
कोणत्या बँकमध्ये नोटा बदलू शकतो ?
• ४००० पर्यंतच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही बँकमध्ये जाऊ शकता.(ओळखपत्रातसोबतच)
४००० च्या नोटा एका व्यक्तीला चलनबदल होईपर्यंत केवळ एकदाच मिळणार आहेत याची ठळक नोंद घ्या!
• ४००० पेक्षा जास्त रकमेसाठी (जी तुमच्या बँक खात्यातच जमा केली जाईल) त्यासाठी मात्र तुमचं खातं ज्या बँकमध्ये आहे तिथेच जावं लागेल. त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत.
• जर दुसर्या बँकच्या (तुमच्या खातं असलेल्या बँकला सोडून) शाखेत पैसे भरायचे असतील तर ओळखपत्र आणि तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स लागतील. (जेणेकरून इलेक्ट्रॉनिकली पैसे ट्रान्सफर करता येतील)
शक्यतो स्वतः हजर असण्याला प्राधान्य दिलं जाईल. जर स्वतः हजर राहणे शक्य नसेल तर तुमच्या प्रतिनिधीसोबत लेखी अर्ज द्यावा लागेल. त्या प्रतिनिधीला ओळखपत्र, परवानगी दिल्याचा पुरावा द्यावा लागेल.
ग्राह्य धरली जाणारी ओळखपत्रं : आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगा कार्ड, पॅन कार्ड, Identity Card Issued by Government Department, Public Sector Unit to its Staff.
ATM मधून नव्या नोटा काढता येतील का ?
बँकाना ATM मध्ये नोटा पुरवताना काही दिवस अडचणी येतील. मात्र ज्यावेळी ATM सुरू होतील त्यावेळी
◾ १८ नोवेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती प्रतिदिन ₹२५०० काढता येतील
◾ १९ नोवेंबर पासून प्रतिव्यक्ती प्रतिदिन ₹४००० काढता येतील
काही ठिकाणी ₹१००,₹५००,₹२००० यांच्यासोबतच ₹५० च्या नोटासुद्धा एटीएममध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत!
नोटा बदलून घेण्यासाठी किती कालावधी आहे ?
ह्या योजनेनुसार ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
जर ३० डिसेंबरपर्यंत नोटा जमा करण्यास जमलं नाही तर आरबीआयच्या शाखांमध्ये संधी दिली जाईल. (काही कागदपत्रे पुरवावी लागतील)
जुन्या ५०० आणि १००० ज्या नोटा खालील ठिकाणी स्वीकारल्या जातील (ठराविक कालावधीपर्यंतच! २४ नोवेंबर)
• सरकारी हॉस्पिटल्स, मेडिकल/औषध दुकाने
• रेल्वे तिकिटे, विमान तिकिटे, इतर सार्वजनिक वाहतूक
• दुग्ध विक्री केंद्रे
• स्मशानस्थल, पेट्रोल पंप (सरकारी)
• महानगरपालिका तसेच इतर सरकारी ठिकाणी थकीत कर भरणा करण्यासाठी
• गॅस सिलेंडर, पाणीपट्टी भरणा, विजबिल भरणा.
इतर सूचना :
▸चेकच्या माध्यमातून प्रतिदिन ₹१०,००० आणि एका आठवड्यात ₹२४,००० (ATM मधून काढलेल्या रकमेला धरून!) २४ नोवेंबर पर्यंत.
▸पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी सध्या NEFT/RTGS/IMPS/इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग उपलब्ध (या पर्यायांवर कोणतीही मर्यादा/अटी नाहीत).
▸कॅश डिपॉजिट मशीनमध्ये जुन्या नोटा डिपॉजिट करू शकता (RBI परिपत्रकाप्रमाणे | प्रत्यक्षात नसण्याची शक्यता!)
▸सध्या भारतात नसाल तर तुमचा प्रतिनिधी पाठवू शकता. सोबत वैध ओळखपत्र आणि लेखी परवानगी पत्र द्यावं लागेल.
▸अत्यावशक सेवांच्या ठिकाणी (हॉस्पिटल/मेडिकल्स/प्रवास) ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्याचे सरकारचे आदेश आहेत.
▸अडचणी असतील तर आरबीआयकडे संपर्क साधा : 022 22602201/022 22602944
इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल वॉलेटबद्दल • इंटरनेट बँकिंग : या पर्यायामध्ये ऑनलाइन व्यवहार करता येतात यासाठी लॉगिन आणि पासवर्डची गरज असते. याद्वारे ऑनलाइन शॉपिंग, रीचार्ज, पैसे खात्यामधून दुसर्या खात्यामध्ये पाठवणे, तिकीट आरक्षण करता येतं. खालील पर्यायांमध्येसुद्धा या सुविधा थोड्याफार फरकामध्ये उपलब्ध.
• क्रेडिट आणि डेबिट कार्ड या पर्यायामध्ये हे प्लॅस्टिक मनी म्हटले जाणारे कार्ड व्यवहारासाठी वापरता येते. एटीएममधून पैसे काढण्यासाठी यांचा प्रामुख्याने वापर होतो.
• मोबाइल वॉलेट : हे ऑनलाइन पाकीट असतं ज्यामध्ये आपल्या बँकमधून काही रक्कम ट्रान्सफर करून ते वॉलेट भरून ठेवायच. मग हे वॉलेट इंटरनेटवर कुठेही वापरता येतं. अलीकडे किराणा दुकाने, फास्ट फूड, अगदी रिक्षाचालकांनीसुद्धा वॉलेटद्वारे पैसे स्वीकारणे सुरू केले आहे. हा सुरक्षित आणि सोपं पर्याय आहे.
▸मोबाइल वॉलेटमध्ये (Paytm, Mobikwik, FreeCharge,Oxigen, m-pesa, Airtel Money, PayUMoney, इ) पर्याय उपलब्ध. ज्यांचा वापर रीचार्ज/खरेदी/पैसे पाठवणे या कारणांसाठी केला जाऊ शकतो.
नोटा बदलल्यामुळे होणारे परिणाम
• चलनामधील काही प्रमाणात काळ्या पैशाला आळा बसेल
• व्यवहारात नव्या नोटांमुळे सुरक्षितता येईल.
• हेर, तस्कर, दहशतवाद्यांच्या देशविघातक कारवायांना मिळणारी मदत थांबेल.
• मिळकतकर (IncomeTax)खात्यातर्फे धाडी, अनेक ठिकाणी अवैध साठवलेला पैसा सापडला.
• मध्यमवर्गास नव्या संधी, रियल इस्टेट, उच्चशिक्षण किंमती आवाक्यात येण्याची शक्यता.
• ऑनलाइन शॉपिंग साइट तर्फे कॅश ऑन डेलिवेरी काही काळ बंद, मोबाइल वॉलेटद्वारे व्यवहार.
• चलनबदला दरम्यान अडचणी मात्र दूरगामी परिणाम चांगले!
नोटांमधील चीपची अफवा : काही प्रख्यात न्यूज वाहिन्यांनी सुद्धा याबद्दल खातरजमा न करता बातम्या दिल्या. नंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की अशी कोणतीही चीप नोटांमध्ये बसवण्यात आली नाही यामुळं चीपबाबत सोशल मीडियावर निव्वळ अफवा पसरल्याच स्पष्ट झालं. नोटबद्दल आरबीआयतर्फे अधिकृत पत्र येथे पहा. नव्या नोटेचा रंग गुलाबी असून मागच्या बाजूला मंगळयानाचे चित्र आहे.
काही घटना :
मोठ्या शहरांत एटीएम मशिन्स अल्पावधीत रिकामी, देशभरात एटीएम मशिन्स, बॅंकांभोवती बंदोबस्त,
अनेक एटीएममध्ये नव्या नोटांचा दुष्काळ, एटीएम कार्ड वापरावरील अधिभार बॅंकांकडून रद्द,
दहा दिवसांत एटीएम सेवा पूर्ववत होणार, लोकांकडून 53 हजार कोटी रुपये बॅंकांत जमा,
उत्पन्नापेक्षा अधिक रोकड भरल्यास दंड, गंगा नदीत लाखोंच्या नोटा!, पुण्यात कचर्यामध्ये ५२०००!, काही व्यापार्यातर्फे उधारीवर व्यवहार, काही ठिकाणी रांगेत थांबताना दुर्दैवी मृत्यू, बाजारपेठा, दुकाने ओस, देवदेवतांच्या मंदिरात देणग्यांची संख्या खालावली, सोशल मीडियामधून अनेक अफवा, २००० च्या नोटाच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह, पं. मोदींकडून ३० तारखेला आणखी एका घोषणेची शक्यता, अनेक बँका/सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे गैरसोयीमुळे वाद आणि नाराजी.
अपडेट : आता बिग बझारच्या २६० शाखांमधूनसुद्धा पैसे काढता येणार आहेत!
नवा लेख अवश्य वाचा : कॅशलेस अर्थव्यवस्था आणि नवे पर्याय !
(हा लेख पूर्णतः टेक्नॉलॉजीसंबंधी नसला तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन जनहितार्थ प्रसिद्ध केला आहे याची नोंद घ्यावी.)
(संदर्भ : न्यूज वाहिन्या, बातमीपत्र, ऑनलाइन लेख, RBI) (काही त्रुटी आढळल्यास संपर्क साधा)
Updated १४-११-२०१६ Limits Raised