आयफोन ७, ७ प्लस आणि अॅपल वॉच २ सादर

आयफोन ७ प्लस 

दरवर्षी अॅपलप्रेमी ज्या क्षणाची वाट पाहतात तो आला आणि अॅपलने एकदाचा नवा आयफोन सादर केला. अॅपल सीईओ टिम कुक यांनी कार्यक्रमाची सुरुवात करत अॅपल म्यूजिक आणि अॅप स्टोरच्या सद्यस्थितीची माहिती सांगितली. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आजपर्यंत अॅपलने तब्बल १ बिलियन (१०० करोड) आयफोन्स विकले आहेत!  आजच्या लेखामध्ये पाहूया अॅपलने आणखी कोणत्या प्रॉडक्टचं सादरीकरण केलं आणि त्याचा काय परिणाम होईल …

• डिजाइन : नवं डिजाइन JetBlack, कॅमेरासाठी नवं डिजाइन, लोगोसाठी नवे कलर्स, नवं टॅपटिक इंजिन!
• वॉटर Resistance : आयफोनवर सुद्धा IP67 Certified
• कॅमेरा : 12MP सेन्सर 60 % वेगवान , नवा फ्लॅश Quad LED सोबत आणि OpticalImageStabilization सुद्धा
7MP फ्रंट कॅमेरा – वाइड कलर कॅप्चर, आजपर्यंतचा सर्वोत्तम आयफोन कॅमेरा
• आयफोन 7 प्लस मध्ये चक्क दोन 12 MP चे कॅमेरे ! 10X डिजिटल झूम !
• रेटिना एचडी डिस्प्ले : 25% अधिक उजळ, सिनेमा दर्जा, 3D टच
• ऑडिओ : स्टीरियो स्पीकर्स, दुप्पट आवाज
• EarPods : आतापासून आयफोनला हेडफोन जॅक बंद केला गेला असून
Lightning पोर्टचा वापर केला जाणार असून फ्री Earpod दिला जाणार आहे.
आश्चर्य म्हणजे जुन्या हेडफोन नव्या फोनवर वापरण्यासाठी प्रत्येकाला adapter दिला जाणार आहे (होय २०१६ साली हे असले प्रकार घडणार!)
AirPods सादर : वायरलेस हेडफोन्स : इन्फ्रारेड सेन्सर हेडफोन कानात घातले की ओळखणार ! २४ तासाची बॅटरी, भन्नाट आवाज ! W१ चीप सह
बॅटरीचा विषय नक्कीच डोकेदुखी ठरेल ! 🙂
• Performace : अॅपल A10 चीप सादर, 64bit, 3.3 बिलियन ट्रांजिस्टर्स !
6 Core ग्राफीक चीप ! A10 चीप स्मार्टफोनवरील सर्वात पावरफुल चीप !
• बॅटरी : आजपर्यंतची आयफोनवर सर्वात जास्त टिकणारी बॅटरी
• ऑपरेटिंग सिस्टम : iOS १०


विशेष बाब म्हणजे अॅपलने आयफोन ७ पासून हेडफोन जॅक काढून टाकला आहे. त्याऐवजी ते त्यांचा Lightning Port चा वापर करणार आहेत. त्यासाठी ते हेडफोन मोफत देणार असून जुन्या हेडफोन ह्या फोनला जोडण्यासाठी अडॅप्टर दिला आहे तोसुद्धा चक्क 9$ (रु.५५०)! टिम कुक यांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलय की 3.5mm हेडफोन जॅक हा अनेक वर्षांपासून चालत आला आहे कधीतरी बदलायलाच हवं (खरेतर अॅपलच्या आधी मोटोने हा जॅक काढून टाकला आहे !)  
आयफोन 7 : दोन मॉडेल्स पैकी एक याची फीचर्स खालीलप्रमाणे 
  1. रंग : Rose Gold, Gold, Silver, Black, Jet Black
  2. स्टोरेज : 32GB/128GB/256GB 
  3. डिस्प्ले : 4.7″ रेटिना एचडी 
  4. प्रॉसेसर : अॅपल A10 
  5. कॅमेरा : 12MP व  f/1.8 आणि 5X डिजिटल झुम, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग 
  6. फ्रंट कॅमेरा : 7MP व f/2.2 आणि फुल एचडी रेकॉर्डिंग 
  7. इतर : फिंगरप्रिंट रीडर, 3D टच, 4G LTE
  8. रॅम : 2GB  
  9. बॅटरी : Unknown  / 3G वर १४ तास         
  10. किंमत : $649
आयफोन ७ प्लस 
आयफोन 7 प्लस  : याची फीचर्स खालीलप्रमाणे 
  1. रंग : Rose Gold, Gold, Silver, Black, Jet Black
  2. स्टोरेज : 32GB/128GB/256GB 
  3. डिस्प्ले : 5.5″ रेटिना एचडी 
  4. प्रॉसेसर : अॅपल A10 
  5. कॅमेरा : मागील बाजूस दोन कॅमेरा असणारा पहिला आयफोन 12MP व  f/1.8 + टेलिफोटो f/2.8, 2X ऑप्टिकल झुम, 10X डिजिटल झुम, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्लो मो सपोर्ट 
  6. फ्रंट कॅमेरा : 7MP व f/2.2 आणि फुल एचडी रेकॉर्डिंग 
  7. इतर : फिंगरप्रिंट रीडर, 3D टच, 4G LTE
  8. रॅम : 2GB  
  9. बॅटरी : Unknown / 3G वर २१ तास  
  10. किंमत : $769        
अॅपल आयफोन ७ मध्ये ड्युल कॅमेरा हे एक वैशिष्ठ्य (अर्थात हे असणारा हा काही पहिला फोन नाही !)
9 सप्टेंबर पासून आयफोन होणार उपलब्ध ! 13 सप्टेंबर पासून iOS10 उपलब्ध ! (भारतातसुद्धा लवकरच दाखल होण्याची शक्यता)
आयफोनसोबतच अॅपलने त्यांच्या स्मार्टवॉचचं नवं व्हर्जनसुद्धा आणलं आहे. हे व्हर्जन अॅपल वॉच सीरीज 2 म्हणून ओळखलं जाईल. यामध्ये नव्या Straps आणि वॉचफेसेसचा समावेश केला आहे. हे घड्याळ आता पूर्णतः वॉटरप्रूफ करण्यात आली आहेत !  
आणखी वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी नाइकि (Nike) या स्पोर्ट्स ब्रॅंड सोबत भागीदारीत “अॅपल नाइकि प्लस” वॉच बनवलं आहे. हे घड्याळ खास धावपटूसाठी बनवण्यात आलं आहे!
अॅपल नाइकि प्लस वॉच 
ह्या व्हर्जनच्या आयफोनपासून नव्या accessories उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे वायर नसलेले एअरफोन ! होय अॅपलने वायरलेस एयरफोन बनवले आहेत. त्यांचं नावं Airpod असं ठेवलं असून त्यांची किंमत 159$ (रु. १०००० )इतकी आहे ! समजा हयातला एकजरी Airpod हरवला तर पुन्हा दहा हजाराचा भुर्दंड! याबद्दल तर यूजरमध्ये खास नाराजी असून सहज हरवण्याचीच शक्यता जास्त असल्याच त्यांचं म्हणणं आहे.
Apple Airpod 
आयफोन Accessories (Click To Enlarge)

याच कार्यक्रमात निंटेंडोने “मारिओ” ही सुप्रसिद्ध गेम आयफोनवर आणत असल्याच जाहीर केलं !
ह्या गेमला नक्कीच उदंड प्रतिसाद लाभेल यात शंका नाही. अनेक वर्षांपासून गेमर्सची इच्छा निंटेंडोने आता पूर्ण केली असून लवकरच अँड्रॉइडवर सुद्धा उपलब्ध होईल अशी अशा आहे!

अॅपल आयफोनचा अधिकृत व्हिडिओ : 
Exit mobile version