एसुस या तैवानी कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध झेनफोन मालिकेमध्ये काल चार नवे फोन सादर केले असून झेनफोन २ सारखच यश पुन्हा मिळवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. हे चार नवे फोन झेनफोन ३, झेनफोन ३ डिलक्स, झेनफोन अल्ट्रा आणि झेनफोन ३ लेजर या मॉडेल्स मध्ये उपलब्ध होतील. या फोन्ससोबतच यांनी झेनबुक ३ नावाचा लॅपटॉप आणि ट्रान्सफॉर्मर ३ प्रो सुद्धा सादर केलाय. ही उपकरणे जून महिन्यात Computex मध्ये जाहीर करण्यात आली होती.
जाणून घेऊया झेनफोनच्या मॉडेल्समधील सुविधा
जाणून घेऊया झेनफोनच्या मॉडेल्समधील सुविधा
झेनफोन ३ डिलक्स: हा फोन आसुसचा फ्लॅगशिप डिवाइस (त्या कंपनीचं सध्याचं सर्वोत्तम प्रॉडक्ट) म्हणून ओळखला जाईल. यामध्ये सुविधाच तशा भक्कम दिल्या आहेत.
- प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 821 2.4GHz
- रॅम : 6GB आणि स्टोरेज : 256GB Internal (होय चक्क 256GB Internal Storage!)
- डिस्प्ले : 5.7 इंच फुलएचडी AMOLED
- कॅमेरा : 23MP सोनी सेन्सर, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP
- बॅटरी : 3000mAh
- अँड्रॉइड 6.0 मार्शमेलो + ZenUI 3.0
- इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर
- किंमत : ६२,९९९
झेनफोन ३ अल्ट्रा : हा इतर फोन्सच्या मानाने सर्वात मोठा डिस्प्ले असलेला फोन आहे.
- प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 652 2.4GHz
- रॅम : 4GB आणि स्टोरेज : 64GB
- डिस्प्ले : 6.8 इंच फुलएचडी
- कॅमेरा : 23MP सोनी सेन्सर, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP
- बॅटरी : 4600mAh
- इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, क्वीकचार्ज 3.0 दूसरा मोबाइल ह्या मोबाइलने चार्ज करता येतो!
- किंमत : ४९,९९९
झेनफोन ३ : हा इतर फोन्सच्या मानाने सर्वात मोठा डिस्प्ले असलेला फोन आहे.
- प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 625 2.0GHz
- रॅम : 3GB आणि स्टोरेज : 64 GB
- डिस्प्ले : 5.5 इंच फुलएचडी SuperIPS
- कॅमेरा : 16MP सोनी सेन्सर, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP
- बॅटरी : 3000mAh
- इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, क्वीकचार्ज 3.0
- किंमत : २७,९९९
झेनफोन ३ लेजर : हा एक बजेट स्मार्टफोन आहे.
- प्रॉसेसर : क्वालकॉम Snapdragon 430 2.0GHz
- रॅम : 4GB आणि स्टोरेज : 32GB
- डिस्प्ले : 5.5 इंच फुलएचडी
- कॅमेरा : 13MP सोनी सेन्सर, EIS, f/2.0, 4K विडियो आणि फ्रंट कॅमेरा 8MP
- बॅटरी : 3000mAh
- इतर : USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर, क्वीकचार्ज 3.0, 0.03 सेकंदात फोकस!
- किंमत : १८,९९९
झेनबुक 3 लॅपटॉप : झेनबुक नावाचा लॅपटॉप ज्यामध्ये i7 प्रॉसेसर, टाइप सी पोर्ट, 12.5 QuadHD डिस्प्ले, गोरीला ग्लास, 9 तासांची बॅटरी लाइफ, फिंगरप्रिंट रीडर आणि वजन केवळ 910 ग्रॅम! याची किंमत १,४४,९९०!
एसुस झेनफोन 3 सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे : Asus Zenfone 3 on Flipkart
याआधीचा लेख : अॅडब्लॉकर आणि फेसबुकचा अॅडब्लॉकविरोधात नवा अल्गॉरिथ्म !