आज तमाम मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत सादर करत आहोत मराठीटेक २.० !
प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेटचा वापर जास्तीतजास्त केला जावा आणि म्हणूनच इंटरनेट, कम्प्युटर अशा तंत्रज्ञानाबद्दल मराठी भाषेतून माहिती पोचायला हवी या उद्देशाने आम्ही मराठीटेकची स्थापना केली होती.
एप्रिल २०१६ पर्यन्त मराठीटेकच्या वेबसाइटला तब्बल सव्वा लाख वाचकांनी भेट दिली आहे! या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे आभारी आहोत.
मराठीटेकचे सोशल मीडियावर चाहते |
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही मराठीटेकवर काही नवीन गोष्टी जोडण्याचे ठरवले आहे. जेणेकरून अधिकाधिक मराठी जनतेला टेक्नॉलॉजीमधील नवनवं संशोधन, नवी उपकरणं यांची माहिती मिळावी.
आम्ही नव्याने सुरू करत असलेले विभाग :
- फोन्सची ओळख : या विभागात सध्या सादर होत असलेल्या नव्या फोन्सबद्दल माहिती दिली जाईल.
- अॅप ओळख : यामध्ये रोज नव्या अॅप्लिकेशनबद्दल सांगितलं जाईल जेणेकरून आपलल्या स्मार्टफोनचा पुरेपूर वापर करून घेता येईल.
- वेबसाइट ओळख : या विभागात काही उपयुक्त पण त्यामानाने प्रसिद्ध नसलेल्या वेबसाइटबाद्दल माहिती दिली जाईल.
- नवं तंत्रज्ञान : या विभागात VR, 3D प्रिंटिंग अशा नवनवी तंत्रज्ञानाबद्दल लेख असतील. आम्हाला खात्री आहे हा विभाग तुम्हाला नक्की आवडेल.
- टॉप १० : यामध्ये सध्याच्या बाजारात उपलब्ध असणार्या फोन्स, अॅप्स मधील सर्वोत्तम दहांची यादी दिली जाईल जेणेकरून वाचकांना सर्वोत्तम फोन्सची खरेदी सोपी होईल.
मराठीटेक २.० वैशिष्ठ्ये :
- नवं अधिक सोप्पं रूप
- अधिकाधिक माहिती
- आणखी ताज्या अपडेट
- नवनवे व्हिडिओज
- फेसबुकवर रोज रंजक पोस्ट्स
- दैनंदिन वापरासाठी उपयुक्त सूचना
- स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, गेम्स, कॅमेरा यांच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल खास लेख
मराठीटेक २.० यूट्यूब व्हिडिओ :