MWC २०१६ कार्यक्रमातील घडामोडी : गॅलक्सी एस ७ व इतर …

MWC (मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस) च्या यंदाच्या कार्यक्रमात आभासी वास्तव  (Virtual Reality) वस्तूंवरभर राहणार असा अंदाज होता आणि प्रत्यक्षात देखील तसच पाहायला मिळत असून सर्व प्रमुख कंपन्या स्वतचे VR यंत्र सादर करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे.
तर चला पाहूया यावर्षी MWC मध्ये काय काय घडत आहे…. कोणते नवे फोन सादर होत आहेत?, कोणती नवी टेक्नॉलजी आली आहे?, कोणत संशोधन झालं आहे?, इ.    

सॅमसंग गॅलक्सी एस ७ : सॅमसंगच्या खास एस सिरिजमधला नवा फोन ज्यामुळे सॅमसंगचा मार्केटमधला दबदबा सर्वांपुढे येईल तो एस ७ आणि एस७ एज सादर केला गेला. यामध्ये एस६ पेक्षा कमी मेगापिक्सेलचा कॅमेरा असून याची गुणवत्ता मात्र त्यापेक्षा व आयफोनपेक्षा चांगली असण्याचा सॅमसंगचा दावा! याचा डिस्प्ले पुढून मागून वक्र असून फोनवरील सॉफ्टवेअरसुद्धा त्यादृष्टीने बनवले गेले आहे. या फोनच्या सादरीकरणावेळी सभागृहातील 3000 प्रेक्षकांना Gear VR देण्यात आला होता ज्याद्वारे सर्वांनी आभासी दुनियेत हा कार्यक्रम पाहिला!

Galaxy S7 Edge

ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड मार्शमेलो ६.०   Android 6.0 Marshmallow software
डिस्प्ले : ५.१ इंची स्क्रीन 2,560×1,440-pixel रेजोल्यूशन
स्टोरेज : ३२ / ६४GB (MicroSD card slot २००GB पर्यंत)
कॅमेरा : १२ मेगापिक्सेल आणि पुढचा कॅमेरा ५ एमपी ड्युल पिक्सेल तंत्रासोबत
बॅटरी :: ३००० mAh, प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 820
इतर सोयी : Water-resistant (IP68 rating), गेम्स रेकॉर्ड करण्यासाठी खास सोय, फास्ट चार्जची सुविधा

या फोनसोबत सॅमसंगने गियर ३६० नावाचा कॅमेरा सादर केलाय जो VR विडियो साठी उपयोगी पडेल, ३६० अंशात विडियो, 30मेगापिक्सेल, 3840×1920 रेजोल्यूशन, वॉटरप्रूफ, मोबाइलमध्ये पाहत फोटो काढता येणार.

Xperia X 

सोनीने त्यांच्या फोन्ससाठी नवी मालिका आणली असून ती सोनी X ह्या नावाने ओळखली जाईल. याच माइलकेत त्यांनी दोन नवे फोन आणले असून त्यांची नवे Xperia X आणि Xperia XA अशी आहेत. ह्या फोन्स मध्ये तसे पाहाला गेलं तर खूप कडक सोयी आहेत असा काही भाग नाही मात्र डिजाइन आणि फोटोसाठी भरपूर सोयी यात देण्यात आल्या आहेत. फूल एचडी डिस्प्ले, 23MP + 13MP कॅमेरा. यासह त्यांनी xperia ear नावाचा ईयरपीस आणला असून तो कमांडला प्रतिसाद देऊन सर्च करून आपल्याला माहिती ऐकवेल!

LG ने सुद्धा त्यांच्या G मालिकेत जी5 नावच्या फोनची भर घातली आहे. ह्या फोन वैशिष्ट्य म्हणजे हा फोन मोड्यूलर प्रकारचा आहे म्हणजे आपल्याला हवे ते पार्ट्स ह्या फोनला जोडून हा फोन बनतो!

 
या फोन्ससोबत कमी भन्नाट प्रॉडक्टदेखील इतर कंपन्यांनी सादर केली आहेत जसे की ZTE ने एक टॅब्लेट आणला आहे जो प्रॉजेक्टरसुद्धा आहे. epson ने त्यांच्या Moverio AR चष्म्याची तिसरी पिढी सादर केली.
मार्क झुकरबर्गने देखील सॅमसंगच्या कार्यक्रमात हजेरी लावून VR मध्ये सोशल पद्धतीने काम कसे करता येईल यावर भाष्य केलं.       

Exit mobile version