MWC 2016 : नवे फोन्स, नवं तंत्रज्ञान !

यापूर्वीच्या लेखात आपण गॅलक्सी एस ७, एक्सपिरीया एक्स या फोन्सची माहिती घेतली. आजच्या लेखात वाचूया आणखी कोणते नवे फोन सादर झाले आणि कोणतं नवं तंत्र लोकांना आकर्षित करत आहे?
Xiaomi Mi5

शायोमी (Xiaomi) : या चीनी कंपनीने बाजारात आता चांगलाच जाम बसवला आहे. सध्या ही कंपनी म्हणजे चीनमधील अॅपल अशी समजली जाते! भारतात सुद्धा यांनी चांगलाच जम बसवला असून यावेळी MWC मध्ये त्यांनी त्यांच्या Mi सिरिज मध्ये Mi5 हा भन्नाट फोन सादर केला आहे. हा फोन सॅमसंगच्या एस 7 ला थेट लढत देईल. त्यात या फोनची किंमत गॅलक्सी एस 7 पेक्षा खूप कमी आहे! तसं पाहायला गेलं तर या फोनमध्ये इतरांपेक्षा नवीन काहीही नाही पण याची किंमत आणि क्वालिटी या गोष्टींमुळे हा फोन उजवा ठरतो.
Xiaomi Mi 5  फीचर्स :

  • ऑपरेटिंग सिस्टम : MIUI7 (Android 6.0 Marshmallow) 
  • डिस्प्ले : 5.15 इंच IPS LCD 2,560 x 1,440 pixels Gorilla Glass 4
  • कॅमेरा : 16एमपी मुख्य कॅमेरा सोबत दोन फ्लॅश, OIS, 4K विडियो रेकॉर्डिंग आणि पुढील कॅमेरा 4एमपी
  • प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 820, 64-bit, Adreno 530 GPU
  • स्टोरेज : 4GB रॅम & 128GB इंटर्नल (मॉडेलनुसार) 
  • इतर : फिंगरप्रिंट स्कॅनर, पाण्यापासून बचाव, 4G, USB Type C, 
  • बॅटरी : 3000mAh
  • किंमत : ~रु. २०,६०० ते २७,९०० (मॉडेलनुसार)   
Lumia 650 
मायक्रोसॉफ्ट लुमिया  ६५० : नोकियाकडून लुमिया ब्रॅंड विकत घेतल्यावर मायक्रोसॉफ्टला आशा होती स्वतःच्या सॉफ्टवेअरमुले मोबाइल मार्केट  काबिज करता येईल मात्र सध्याच चित्र खूप निराशाजनक असून लुमियाच्या विक्रीत प्रचंड घाट नोंदवली गेली आहे. विंडोज १० च्या नादात अनेक यूजरचे फोन्स बिघडले असून विंडोज फोन १० बद्दल देखील फारसा चांगला अनुभव नाही. तरीसुद्धा मायक्रोसॉफ्ट मागे हटण्यास तयार  नाही त्यांनी आणलाय नवा फोन.. याची किंमत ~रु १३६०० असेल. अनेकांना आश्चर्य वाटत आहे की हा फोन चांगला कसा काय बनला आहे, याची किंमत पाहता 950 आणि 950XL पेक्षा हा फोन वापरण्यास चांगला वाटत असल्याच विश्लेषकांच म्हणणं आहे!
लुमिया 650 फीचर्स :    
  • ऑपरेटिंग सिस्टम : विंडोज फोन १० 
  • डिस्प्ले : 5 इंच OLED  एचडी 
  • कॅमेरा : 8 एमपी मुख्य कॅमेरा  पुढील कॅमेरा 5 एमपी
  • प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 212
  • स्टोरेज : 1GB रॅम & 16GB इंटर्नल (मॉडेलनुसार) सोबत  200GBच मेमोरी कार्ड चालेल ! 
  • बॅटरी : 2000mAh
  • किंमत : ~रु. १३,६००  (मॉडेलनुसार) 
एचटीसी ( HTC) :   HTC ने अनोखे रंग असलेले  डिजाइन सादर केले. त्यांनी त्यांच्या नव्या Desire 825,630,530 या मॉडेल्स मध्ये या रंगाचा वापर केला असून त्यासाठी मायक्रो स्पलॅश तंत्राचा वापर केला आहे. या सर्व फोन्स मध्ये 5 इंची डिस्प्ले मार्शमेलो ओएस असून हे फोन मार्च मध्ये उपलब्ध होतील. 
जियोनी(Gionee) : या कंपनीने त्यांच्या S सिरिजमध्ये एस८ हा नवा फोन सादर केलाय यामध्ये ५.५इंची डिस्प्ले जो फुल एचडी ३डी टच सुविधेने युक्त असा आहे. यामध्ये 4GB रॅम, मार्शमेलो ओएस, 64GB स्टोरेज, 3000mAh बॅटरी, 16MP आणि पुढील 8MP कॅमेरा अशी फीचर्स आहेत. 
FlexEnable Flexi Display
FlexEnable : सध्या वाकवता येणार्‍याडिस्प्ले तयार करण्याची नवी स्पर्धा सुरू झाली आहे. काही महिन्यापूर्वी LG ने मोठा पेपर डिस्प्ले दाखवला होता जो अक्षरशः घडी घालता येणारा होता! या FlexEnable या कंपनीने नवा डिस्प्ले सादर केला आहे जो वाकवता येत नाही पण तो आधीच वक्र अवस्थेत आहे की आपण आपल्या हाताभोवती गुंडाळू शकतोय!  ही कंपनी डिस्प्लेचं उत्पादन करत नाही त्यामुळे हा डिस्प्ले केवळ एक प्रोटोटाइपच म्हणावं लागेल. 

ह्या डिस्प्लेबद्दल विडियो लिंक : https://youtu.be/A1azlGZiBvc 

Huawei MateBook

हयुवावे (Huawei) : या चीनी कंपनीने नवा लॅपटॉप आणला आहे जो टॅब्लेट सारखा काम करू शकेल! याचा कीबोर्ड आणि मॉनिटर वेगळे करता येतात आणि यासोबत एक स्टायलस सुद्धा येतो! ज्यामुळे आपल्याला एक पूर्ण पीसी अनुभव (गेमिंग, फॉटोशॉप,इ) या लॅपटॉप/टॅब्लेटवर अनुभवता येईल. यामध्ये 12 इंची एचडी डिस्प्ले, विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम, ४GB रॅम, १२८जीबी SSD!, फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा! याची किंमत ~रु. ४५००० पासून आहे (मॉडेलनुसार)          

Exit mobile version