विंडोज १० नोवेंबर अपडेट : कोर्टाना भारतात उपलब्ध

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या सध्याच्या विंडोज १० ह्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी काल नवं अपडेट उपलब्ध करून दिलय. ह्या अपडेट मध्ये अनेक गोष्टींची दुरूस्ती करून सुधारणा करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे विंडोज ७ , ८ , ८.१ ह्या पैकी कोणतीही एक ओएस आहे आणि ती खरीखुरी कॉपी आहे तर त्यांच्यासाठी विंडोज १० अपडेट फुकट आहे. यापूर्वी विंडोज १० ल काही अडचणी येत होत्या मात्र आता बर्‍याच अडचणी दूर केल्यामुळे आता अपडेट करण्यास काहीच हरकत नाही. (आपल्या पीसीचे हार्डवेअर पाहून मग विंडोज वेबसाइटवर तपासून घ्या)

ह्या अपडेट मधील नव्या गोष्टी आणि ज्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे त्याबद्दल माहिती :

  • परफॉर्मेंस : ह्या अपडेटमुळे कम्प्युटर सुरू होण्यास हा विंडोज ७ पेक्षा ३०%  अधिक वेगवान असेल. 
  • रंग : यापूर्वी विंडोज 10 मध्ये केवळ पांढर्‍या रंगाच्याच टाइटल बार होत्या मात्र आता हव्या त्या रंगाची निवड करता येईल.  
  • कोर्टाना : ही Virtual Assistant जी आपल्याला आपल्या पीसीसोबत बोलून आपले काम करण्यासाठी उपयुक्त आहे ती आता भारतात उपलब्ध करण्यात आली आहे. (सोबत जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा) या अपडेटमुळे कोर्टाना आता इवेंट, मूवी बूकिंग, काही गोष्टींची आठवण, उबर टॅक्सी ट्रॅक, विंडोज फोनसोबत डाटा शेअर ही कामे करेल! तसेच कोर्टानाच्या स्क्रीनवर लिहून देखील सूचना देता येतील(पेन असल्यास). 
  • Edge ब्राऊजर : ह्या नव्या ब्राऊजरमध्ये आता अधिक चांगला परफॉर्मेंस आणि सेक्युर्टी मिळेल. सोबत हा ब्राऊजर तुमच्या सर्वच डिवाइस मध्ये डाटा Sync करेल त्यामुळे एका डिवाइस मधील बूकमार्क्स दुसरीकडे देखील पाहायला मिळतील. कोर्टाना ह्यामध्ये बेस्ट कूपन्स बद्दल माहिती देईल !
  • मेल, कॅलेंडर, फोटो, ग्रूव, एक्सबॉक्स, स्टोअर, वननोट या Apps न देखील  अपडेट करण्यात आलं आहे. 
  • विंडोज हॅलो : हे फीचर काही ठराविक डिवाइसवरच उपलब्ध आहे. यामुळे आपले बोट आणि चेहरा समोर असेल तरच लॅपटॉपवर लॉगिन होता येईल. 
  • विंडोज डिफेंडर : मायक्रोसॉफ्टचा फ्री मॅलवेर स्कॅनर आता अधिक चांगलं संरक्षण करेल. 

विंडोज १० अपडेट करण्यासाठी लिंक : Windows 10 Upgrade          

या अपडेटमधील बदल अधिक तपशीलवार जाणून घेण्यासाठी WindowsCentral च्या लिंक वर जा. 

Exit mobile version